'अनपॉज्ड: नया सफर' ट्रेलर लाँच, प्रत्येक कलाकृतीतून उलगडणार अनेक भावनिक छटा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 08:20 PM2022-01-15T20:20:19+5:302022-01-15T20:20:55+5:30

हिंदी कथांचा संग्रह असलेला अनपॉज्ड: नया सफर (Unpaused : Naya Safar)चा लक्षवेधी ट्रेलर लॉन्च करण्यात आला. याचा प्रीमियर २१ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.

'Unposed: New Journey' Trailer Launched | 'अनपॉज्ड: नया सफर' ट्रेलर लाँच, प्रत्येक कलाकृतीतून उलगडणार अनेक भावनिक छटा

'अनपॉज्ड: नया सफर' ट्रेलर लाँच, प्रत्येक कलाकृतीतून उलगडणार अनेक भावनिक छटा

googlenewsNext

प्राईम व्हीडिओ’च्या वतीने आज हिंदी कथांचा संग्रह असलेला अनपॉज्ड: नया सफर ‘चा लक्षवेधी ट्रेलर लॉन्च करण्यात आला. याचा प्रीमियर जगभर २१ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. अनपॉज्ड च्या पहिल्या आवृत्तीला भरभरून प्रतिसाद मिळाला असून २०२० मध्ये प्रीमियर झाला होता.  कसदार अभिनयाकरिता प्रसिद्ध असलेले साकीब सलीम, श्रेया धन्वंतरी, नीना कुलकर्णी आणि प्रियांशू पेनयुली व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळतील. अंधाऱ्या बोगद्याच्या शेवटी प्रकाशाचा साक्षात्कार होतो, हे हृदयस्पर्शी संस्मरण अनपॉज्ड: नया सफर ‘मधून दिल्याचे दिसते. 

'अनपॉज्ड: नया सफर' या कथा संग्रहात नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अर्जुन करचे व हनुमंत भंडारी अभिनीत वैकुंठ,  तीन तिघाडा, दिग्दर्शन- रुचिर अरुण; साकीब सलीम, आशीष वर्मा आणि सॅम मोहन अभिनीत, द कपल, दिग्दर्शन- नुपूर अस्थाना; श्रेया धन्वंतरी आणि प्रियांशू पेनयुली अभिनीत. गोंद के लड्डू, शिखा माकन दिग्दर्शित; दर्शना राजेंद्र आणि लक्षवीर सिंग सरन अभिनीत.  वॉर रूम, अयप्पा केएम दिग्दर्शित; गीतांजली कुलकर्णी, रसिका आगाशे, पुरनंदन वांधेकर आणि शर्वरी देशपांडे अभिनीत या लघुपटांचा समावेश आहे.


वैकुंठचे दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले की, “अनपॉज्ड: नया सफर कथा संग्रह मालिकेच्या प्रत्येक कलाकृतीत अनेक भावनिक छटा उलगडल्या आहेत. वैकुंठ दु:ख आणि आशेचे संतुलन राखते. त्यात अनिश्चितता खच्चून भरली आहे. एक टीम म्हणून मला अभिमान वाटतो आणि या कलाकृतीचा भाग होता आले, हे माझे भाग्य मानतो. प्रेक्षकांच्या मनात ही मालिका दीर्घकाळ घर करेल, ही आशा बाळगतो.”  तीन तिघाडाचे दिग्दर्शक रुचिर अरुण म्हणाले की,“अनपॉज्ड: नया सफर मधील कथा प्रवाही आहेत, त्यात भावनांची सरमिसळ असून या संग्रहांची फिल्म प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.” 
नुपूर अस्थाना, द कपलचे दिग्दर्शक सांगतात की, “महासाथीत नोकरी-धंद्यावर मोठा परिणाम झाल्याने, हातात येणारे उत्पन्न रोडावले. अनिश्चिततेने हताश केले. व्यावसायिक स्तरावरील बदलामुळे जोडीदारांत निर्माण झालेला भावनिक तणाव आणि गुंतागुंत द कपल’मधून अधोरेखित होते.   
गोंद के लड्डू’ च्या दिग्दर्शिका शिखा माकन म्हणाल्या की, “गोंद के लड्डू ‘मधून मानवी बंध उलगडले असून कथा वळण घेणाऱ्या आहेत. ही फिल्म छायाचित्रित करण्याचा अनुभव समृद्ध होता. अफलातून कलाकारांनी कथानके जिवंत केली असून निवेदन आशयघन आहे. प्रेक्षकांना भावनिक स्तरावर नक्कीच कथेशी नाळ जोडता येईल." वॉर रूम ‘चे दिग्दर्शक अय्यप्पा केएम म्हणाले की, “वॉर रूम’मध्ये फ्रंटलायनर वर्करनी महासाथीसारख्या असुलभ स्थितीत अनुभवलेली गंभीर अवस्था दर्शवली आहे. ही कथा गुंतवून ठेवणारी आहे. ”

Web Title: 'Unposed: New Journey' Trailer Launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.