'आर्या'नं अशारितीने बदललं सुष्मिता सेनचं जीवन, खुद्द अभिनेत्रीनेचं केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 01:53 PM2021-11-20T13:53:42+5:302021-11-20T13:54:05+5:30

अभिनेत्री सुष्मिता सेनची बहुचर्चित वेबसीरिज 'आर्या'चा दुसरा सीझन लवकरच रिलीज होणार आहे.

'Aarya' changed Sushmita Sen's life in such a way, the actress herself revealed | 'आर्या'नं अशारितीने बदललं सुष्मिता सेनचं जीवन, खुद्द अभिनेत्रीनेचं केला खुलासा

'आर्या'नं अशारितीने बदललं सुष्मिता सेनचं जीवन, खुद्द अभिनेत्रीनेचं केला खुलासा

Next

राम माधवानी दिग्दर्शित आर्या सीझन 2 लवकरच डिस्ने + हॉटस्टार वर प्रदर्शित होणार आहे. सुष्मिता सेन अभिनीत या अॅक्शन ड्रामाच्या पहिल्या सीझनचे खूप कौतुक झाले आणि नुकतेच निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनचा दमदार टीझर रिलीज केला. अभिनेत्री पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत परतत असून, आर्याने तिच्या आयुष्यावर केलेल्या प्रभावाबद्दल नुकतेच सुष्मिताने सांगितले.

सुष्मिता सेन म्हणाली की, "मला वाटते की आर्यच्या आधी, मी एका कलाकाराप्रमाणे होते, वैयक्तिक आघाडीवरही मला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. सोबतच आव्हानात्मक अशा ५ वर्षांच्या कालावधीचा सामना केला आहे. मला असे वाटते की जगाने मला बक्षीस द्यावे कारण मी असे काम केले आहे जिथे पोहोचणे खूप कठीण आहे! मी आर्याकडे त्याचीच पोचपावती म्हणून पाहते. केवळ व्यावसायिक स्तरावर नाही, ती अगदी योग्य वेळी माझ्याकडे आली. आर्याची भूमिका साकारणे हा एक उत्तम अनुभव होता आणि तो यशस्वीपणे साकारण्यासाठी, कुटुंबाला एकत्र ठेवू शकणारी आई आणि स्त्री यांचे नाते दाखवणे, जरी कुटुंब अंडरवर्ल्ड आणि ड्रग माफियाशी संबंधित असले तरीही ती त्याला एकत्र जोडते."

माझ्या आयुष्यात खूप चांगले बदल केले आहेत
सुष्मिता पुढे म्हणाली की, "मला वाटते आर्याने माझे आयुष्य अनेक पातळ्यांवर बदलले आहे. एक अभिनेत्री म्हणून आर्याचा एक भाग बनणे हा एक रोमांचक अनुभव होता आणि ही एक सुंदर सीरिज आहे. मला वाटते की हा एक अष्टपैलू अनुभव होता ज्याने माझ्या आयुष्यात खूप चांगले बदल केले आहेत.”
आर्या २च्या टीझरनंतर चाहते दुसऱ्या सीझनची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ही सीरिज लवकरच केवळ डिज़्नी+हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: 'Aarya' changed Sushmita Sen's life in such a way, the actress herself revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app