ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 06:30 IST2024-05-13T06:28:19+5:302024-05-13T06:30:33+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हरलेल्या मानसिकतेमधून वक्तव्ये करत आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर: लोकसभेची सुरू असलेली निवडणूक ही भारतीय जनता पक्ष विरुद्ध जनता अशी झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आता मुद्दे उरलेले नसल्याने ते मंगळसूत्र, मुस्लीम देशाची फाळणी या विषयांवर वक्तव्य करत सुटले आहेत. त्यांची वक्तव्ये हरलेल्या मानसिकतेमधून केली जात आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पालघरमध्ये केली.
आंबेडकर हे रविवारी मुंबई ते पालघर असा स्वराज एक्स्प्रेस ट्रेनने प्रवास करत पालघर रेल्वे स्थानकात दाखल झाले. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पालघर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. ते पत्रकारांशी संवाद साधल्यावर ते वंचित बहुजन आघाडीच्या पालघर लोकसभेच्या उमेदवार विजया म्हात्रे यांच्या प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी बोईसरच्या खैरापाडा मैदान येथे रवाना झाले.