नदीपात्रात बुडून दोन जीवलग मित्रांचा दुर्देवी मृत्यू

By चैतन्य जोशी | Updated: June 13, 2024 21:08 IST2024-06-13T21:07:46+5:302024-06-13T21:08:23+5:30

पुलगाव शहरात हळहळ : पोलिसांनी घेतली नाेंद

two close friends dies after drowning in the river | नदीपात्रात बुडून दोन जीवलग मित्रांचा दुर्देवी मृत्यू

नदीपात्रात बुडून दोन जीवलग मित्रांचा दुर्देवी मृत्यू

पुलगाव (वर्धा) : वर्धा नदीपात्रात बुडून दोन जिवलग मित्रांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना १३ रोजी दुपारच्या सुमारास उजेडात आली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास पुलगाव पोलिस करीत आहेत.सुरेश लक्ष्मण लाडेकर (५७ रा. घुबडटोली पुलगाव), गणेश बन्सी चचाणे (५७ रा. घुबडटोली पुलगाव) अशी मृतकांची नावे आहे.

सविस्तर वृत्त असे की, मृतक सुरेश आणि गणेश हे दोघेही एकमेकाच्या शेजारी राहत असून दोघेही जिवलग मित्र आहेत. दोघेही मजुरी काम करतात. १२ जून रोजी सकाळी ११ वाजता दोघेही मजुरी कामानिमित्त घराबाहेर निघाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने दोघांच्याही घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कुठेही मिळून आले नाही.

अखेर गुरुवारी १३ रोजी दोघांचेही मृतदेह जुना पुलगाव येथील वर्धा नदीपात्रात तरंगताना आढळून आले. दोन्ही मृतक हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याप्रकरणी शंकर लक्ष्मण लाडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुलगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title: two close friends dies after drowning in the river