आपल्या लघवीचा रंग बदलला? तर या आजाराची आहे शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 17:48 IST2025-02-15T17:48:04+5:302025-02-15T17:48:42+5:30
Wardha : लाल लघवीकडे दुर्लक्ष करू नका

If the color of your urine has changed, is there a possibility of this disease?
वर्धा : लघवीचा रंग बदलणे, लघवीचा उग्र वास येणे हे शरीरात विकसित होणाऱ्या नव्या आजाराचे लक्षण असू शकतात. लघवीच्या रंगातून आपल्याला आजार कळतो. लघवीचा रंग पिवळा असावा. लघवीचा रंग पूर्णपणे स्पष्ट असणे, हेही धोकादायक ठरू शकते.
लघवीला उग्र वास येत असल्यास हा धोका
लघवीला उग्र वास येत असेल तर मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो. यावेळी घाबरून जाऊ नये. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतला पाहिजे.
पिवळ्या रंगाच्या लघवीची ही कारणे
लघवी फिकट पिवळ्या रंगाची असेल तर याचा अर्थ चांगले हायड्रेटेड आहात. जर लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर रिहायड्रेशनचा धोका आहे. अशावेळी जास्त पाणी प्यावे. पिवळ्या रंगाची लघवी ही पीलिया रोगाचेही लक्षण असू शकते.
लाल लघवीकडे दुर्लक्ष नको
ब्लूबेरी, बीटरूट आदींचे सेवन केल्याने लघवीचा रंग लाल किंवा गुलाबी दिसू शकतो. मात्र लघवीतून लाल रक्त येत असल्यास दुर्लक्ष करू नये. हे कॅन्सरचेही लक्षण असू शकते. त्यामुळे लघवीच्या रंगाकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरणारे आहे.
...तर इन्फेक्शन
लघवीच्या रंगात बदल किंवा उग्र वास येण्याकडे दुर्लक्ष करून नये. रंगात बदल झाल्यास इन्फेक्शन असू शकते. बदल दिल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
"लघवीचा रंग बदलण्यामागे लघवी, मूत्रमार्गाचा संसर्ग हे कारण असू शकते. पिवळा रंग पीलिय, लाल रंगाची लघवी कॅन्सरची शक्यता असू शकते. काही बदल जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करुन नका. तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेणे आवश्यक आहे."
- डॉ. रोशन शेंडे, वर्धा.