Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 11:14 IST2025-12-13T11:13:01+5:302025-12-13T11:14:05+5:30
Lucknow Shocker: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ शहरात प्रेमसंबंधातून घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे खळबळ उडाली.

Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ शहरात प्रेमसंबंधातून घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे खळबळ उडाली. ब्रेकअपमुळे संतप्त झालेल्या एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार केला. ही घटना शुक्रवारी (१२ डिसेंबर २०२५) पारा पोलिस स्टेशन परिसरातील काशीराम कॉलनीत घडली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
आकाश कश्यप नावाच्या तरुणाने लक्ष्मी थापा नावाच्या तरुणीवर गोळीबार केला. आरोपी आकाशने घरात प्रवेश करून लक्ष्मीवर गोळी झाडली. सुदैवाने, ही गोळी मुलीच्या हाताला लागली आणि ती बचावली. गोळी लागल्यामुळे जखमी झालेल्या लक्ष्मीला तातडीने लोकबंधू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.
संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी आकाश कश्यप यांचे पूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून लक्ष्मीने आकाशशी बोलणे बंद केले होते आणि त्यांच्यात ब्रेकअप झाले होते. या ब्रेकअपमुळे आणि तरुणीने संबंध तोडल्यामुळे आरोपी आकाश कश्यप अत्यंत संतापलेला होता. याच रागातून त्याने हे भयानक कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
आरोपीचा शोध सुरू
पारा येथील काशीराम कॉलनीत राहणाऱ्या लक्ष्मी थापा यांची मोठी बहीण राधिका थापा यांनी याप्रकरणी पारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. राधिका यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आकाश कश्यपविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा कसून शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस आरोपीला लवकरच अटक करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.