उल्हासनगर महापालिका मतदान जनजागृती उपक्रम; मतदान करा, खरेदीवर सवलत घ्या, व्यापारी संघटनेचा निर्णय

By सदानंद नाईक | Published: May 4, 2024 06:48 PM2024-05-04T18:48:11+5:302024-05-04T18:48:31+5:30

मतदानाचे दिवशी आणि त्याआधी येणाऱ्या विशेष प्रसंगी मतदान करावे.

Ulhasnagar Municipal Voting Awareness Activities Vote, get discounts on purchases, trade association decisions | उल्हासनगर महापालिका मतदान जनजागृती उपक्रम; मतदान करा, खरेदीवर सवलत घ्या, व्यापारी संघटनेचा निर्णय

उल्हासनगर महापालिका मतदान जनजागृती उपक्रम; मतदान करा, खरेदीवर सवलत घ्या, व्यापारी संघटनेचा निर्णय

उल्हासनगर : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महापालिका जनजागृती मोहीम राबवित असून व्यापारी संघटनेने मतदान करणाऱ्या नागरिकांना खरेदीवर १० ते २० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. उपायुक्त किशोर गवस यांनी शुक्रवारी व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक घेतल्यावर, बैठकीत सवलतीचा निर्णय व्यापारी व्यापारी संघटनेने घेतला आहे. 

उल्हासनगर महापालिका उपायुक्त किशोर गवस यांनी मतदान जनजागृती उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक बोलाविली होती. बैठकीत मतदान टक्केवारी बाबत चर्चा झाल्यावर, व्यापाऱ्यांनी मतदान करणाऱ्या नागरिकांना दुकानातील खरेदीवर १० ते २० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. तसेच निवडणुक विभागातर्फे देण्यात आलेले स्टिकर्स, प्रसिद्धीपत्रक मतदान जनजागृतीसाठ उपस्थित व्यापाऱ्यांना देण्यात आली. 

मतदानाचे दिवशी आणि त्याआधी येणाऱ्या विशेष प्रसंगी मतदान करावे. यासाठी ग्राहकांना खास सवलत देणेबाबत उपस्थित व्यापारी वर्गाने मान्य केले. तसेच याकामी पूर्ण सहयोग देणार असल्याची ग्वाही नागरिकांना देण्यात दिली. महापालिकेने बोलविलेल्या बैठकीला उपायुक्त डॉ. किशोर गवस, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह सर्व प्रभाग अधिकारी, निवडणुक विभाग प्रमुख आणि जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे आदीजन उपस्थित उपस्थित होते.

Web Title: Ulhasnagar Municipal Voting Awareness Activities Vote, get discounts on purchases, trade association decisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.