हिरानंदानी परीसरात मतदार जोडो पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By सुरेश लोखंडे | Published: May 10, 2024 04:36 PM2024-05-10T16:36:21+5:302024-05-10T16:37:13+5:30

या ठाणे लाेकसभा मतदारसंघातील ठाणे विधानसभेच्या कार्यक्षेत्रात आज ही पदयात्रा मतदार जनजागृतीसाठी काढण्यात आली.

Spontaneous response of citizens to voter Jodo padayatra in Hiranandani area | हिरानंदानी परीसरात मतदार जोडो पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिरानंदानी परीसरात मतदार जोडो पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यास अनुसरून या लाेकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेट परिसरात मतदार जोडो पदयात्राचे आज आयोजन करण्यात आले. त्यास परिसरातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत पदयात्रेत सहभाग घेतला.

या ठाणे लाेकसभा मतदारसंघातील ठाणे विधानसभेच्या कार्यक्षेत्रात आज ही पदयात्रा मतदार जनजागृतीसाठी काढण्यात आली. या पदयात्रेत माेठ्या उत्साहात मॅस्कॉट या मनोरंजक कार्टून पात्राला सोबत घेऊन मतदान करा,मतदान करा लोकशाहीचा विजय करा आणि २० मे को सब काम छोडो मतदान करो या घोषणा मोठ्या आवाजात घाेषणा देण्यात आल्या आहेत. संपूर्ण हिरानंदानी इस्टेट परीसरात मॅस्कॉटच्या माध्यमातून नागरिकांचे मनोरंजन करत उपस्थित नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करीत आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले.

रस्त्याच्या दुतर्फा बाजूकडील नागरिक, व्यावसायिक, फळ, भाजी विक्रेते या मतदार लोकांना या रॅलीतून मतदान करण्यासाठी जागृती करण्यात आली.. रॅलीमधील मॅस्कॉट सोबत स्वीप कर्मचारी जनजागृती करीत असल्याचे पाहून मतदारांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला होता.

Web Title: Spontaneous response of citizens to voter Jodo padayatra in Hiranandani area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.