शिंदेसेना नवी मुंबईचा वचपा ठाण्यात काढण्याच्या तयारीत, महापालिकेतील समित्यांमध्ये स्थान न देण्याची भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 06:01 IST2026-02-24T06:00:10+5:302026-02-24T06:01:34+5:30

Thane Politics: पहिल्याच महासभेत सत्तेत असलेल्या भाजपला शिंदेसेनेने थेट विरोधी बाकावर जाण्यापर्यंत विचार करण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे.

Shinde Sena is preparing to remove Navi Mumbai's Vachpa police station, the role of not giving it a place in the municipal committees? | शिंदेसेना नवी मुंबईचा वचपा ठाण्यात काढण्याच्या तयारीत, महापालिकेतील समित्यांमध्ये स्थान न देण्याची भूमिका?

शिंदेसेना नवी मुंबईचा वचपा ठाण्यात काढण्याच्या तयारीत, महापालिकेतील समित्यांमध्ये स्थान न देण्याची भूमिका?

-अजित मांडके, ठाणे
नवी मुंबईत परिवहन समितीमध्ये नियमबाह्य कामकाज केल्याचा आरोप करत शिंदेसेनेने भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र त्यानंतरही भाजपकडून नवी मुंबईत शिंदेसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा वचपा शिंदेसेनेने ठाण्यात काढण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.

पहिल्याच महासभेत सत्तेत असलेल्या भाजपला शिंदेसेनेने थेट विरोधी बाकावर जाण्यापर्यंत विचार करण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना स्वतंत्र लढले. तेथे शिंदेसेना विरोधी बाकावर बसली आहे. ठाण्यात दोन्ही पक्षांनी युती केली. भाजप सत्तेत सहभागी झाला. त्यांच्याकडे उपमहापौरपद आहे. इतर समित्यांवर देखील भाजपने दावा केला आहे.

...म्हणून दोघांमध्ये सामना

नवी मुंबई पालिकेत संख्याबळानुसार परिवहन समिती सदस्यांची निवड करणे अपेक्षित असताना भाजपने त्यांचेच सदस्य दिले. त्यातून भाजप विरुद्ध शिंदेसेना सामना रंगला आहे. त्याचे पडसाद ठाण्यातही पडू लागले आहेत.

प्रशासनाच्या काळातील कारभाराबाबत विचारलेल्या प्रश्नांवर महासभेत उत्तर मिळण्याची भाजपला अपेक्षा होती. मात्र, त्यांची मागणी फेटाळण्यात आली. तसेच पक्षाचे जोडे बाहेर काढून यावेत, अशी अप्रत्यक्ष टीकाही शिंदेसेनेने भाजपवर केली.

इतर समित्यांमध्ये स्थान मिळणार नाही?

नवी मुंबईत परिवहन समिती सदस्यांच्या निवडीबाबत भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका ठाण्यात शिंदेसेनेकडून घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ठाणे महापालिकेत स्थायी समिती सदस्यांसह, विषय समित्या, प्रभाग समित्या, परिवहन, वृक्ष प्राधिकरण, शिक्षण समिती सदस्य निवडीची प्रक्रिया अजून बाकी आहे.

नवी मुंबईत भाजपने भूमिका २ न बदलल्यास ठाण्यातही भाजपला इतर समित्यांमधील वाटा विसरावा लागेल, अशी भूमिका शिंदेसेनेने घेतल्याची चर्चा आहे. 

सत्तेत राहून भाजपची चौकीदाराची भूमिका असेल तर इतर समित्यांमध्येही स्थान न देण्याचा निर्णय शिंदेसेना घेऊ शकते.

Web Title : शिंदे सेना का ठाणे में बीजेपी पर पलटवार, नवी मुंबई का बदला!

Web Summary : शिंदे सेना ने नवी मुंबई के मुद्दे पर ठाणे में बीजेपी को समितियों से बाहर करने की धमकी दी, गठबंधन में तनाव बढ़ गया।

Web Title : Shinde Sena Retaliates Against BJP in Thane Over Navi Mumbai Snub.

Web Summary : Shinde Sena threatens to exclude BJP from Thane committees, retaliating against alleged BJP actions in Navi Mumbai. Tensions rise between the allies.