प्रचारादरम्यान भिवंडीत काँग्रेस-भाजपात झालेला राडा; दोन गटांतील २३ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 06:09 IST2026-01-05T06:09:00+5:302026-01-05T06:09:22+5:30
कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यात दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात २३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रचारादरम्यान भिवंडीत काँग्रेस-भाजपात झालेला राडा; दोन गटांतील २३ जणांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : प्रचारादरम्यान शनिवारी सायंकाळी भंडारी चौक नारपोली या ठिकाणी काँग्रेस व भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यात दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात २३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप उमेदवार यशवंत टावरे यांनी नारपोली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल, राज यादव, धर्मेंद्र पाल, राहुल पाल, अश्विनी वर्मा उर्फ मल्लू, गोपी वर्मा, लक्की जयस्वाल, नूर अली चायनीजवाला, लखन राठोड, रोहित यादव उर्फ लेंडी, विकी वर्मा, यश पाटील व इतर ३० ते ३५ अनोळखी व्यक्तींवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला, तर काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांनी भोईवाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर यशवंत टावरे, रुपम टावरे, योगेश टावरे, रितेश टावरे, भरत टावरे, किरण माने, राजा इंदुरकर, विक्की बिल्लारे,राहुल जाधव, जसवंत गुप्ता, नीतेश जाधव व इतर चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.