ठळक मुद्देआता पुढील भागात गुरूचे वडील नागपूरच्या जमिनीचे कागदपत्रं त्याला देणार आहेत. आता या जमिनीच्या कागदपत्रांचा गुरू खरंच स्वतःच्या कामासाठी वापर करतो की पुन्हा शनायाकडे जातो हे पाहाणे रंजक ठरणार आहे.  

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता नेहमीच प्रेक्षकांना लागलेली असते. आता या मालिकेत पुढे काय होणार हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

राधिका आणि सौमित्र यांचे लग्न झालेले असून त्यांच्या संसारात ते प्रचंड खूश आहेत. सौमित्रला आईस्क्रीम आवडते. त्यामुळे ते दोघे आईस्क्रीम खायला बाहेर आले आहेत. पण राधिकाला आईस्क्रीम खाल्ल्याने सर्दी होते असे सौमित्र राधिकाला सांगत त्याला देखील आईस्क्रीम नको असे सांगतो. त्यावर मला काय आवडते, काय आवडत नाही याचा तू नेहमीच विचार करतोस... आता मला तुझ्या आवडी निवडीचा विचार करू दे... असे सांगत राधिका सौमित्रसोबत आईस्क्रीम खाते.

तर दुसरीकडे गुरू हा शनायाच्या घरातील गडी बनला आहे. तो शनाया आणि सुलक्षणासाठी चहा घेऊन येतो. एवढेच नव्हे तर मी घरातील सगळी कामं करेन पण शनायाच्या लग्नाचा तुम्ही विचार करू नका असे सुलक्षणाला सांगतो. त्यावर सुलक्षणा शनायाला सांगते की, तुला रंजन मेहताचे स्थळ आले असून ते पाच लाख रुपये द्यायला आहेत. त्यावर तू लग्न करू नकोस अशी गयावया गुरू शनायाकडे करतो. त्यावर तू पाच लाख दिले तर आम्ही लग्नाचा विचार करणार नाही असे सुलक्षणा आणि शनाया गुरूला सांगतात. एका दिवसांत पाच लाख रुपये दे... नाहीतर मी लग्नाचा विचार करेन असे सांगत शनाया निघून जाते.

पैसे कुठून आणायचे या टेन्शनमध्ये गुरू असताना इथे गुरूच्या आईवडिलांच्या घरी पिकनिकची तयारी सुरू आहे. गुलमोहरमधील सगळी मंडळी पिकनिकला जाण्याचा बेत आखत आहेत. तेवढ्यात गुरूला आठवते की, त्याच्या आई वडिलांची नागपूरला एक जमीन असून ती त्याच्याच नावावर आहे. त्यामुळे तो थेट त्याच्या घरी पोहोचतो आणि आईच्या हातापाया पडत रडतो. त्यावर त्याचे वडील त्याला घराच्या बाहेर जायला सांगतात तर गुरू, तुम्ही मला समजून घ्या असे आईवडिलांना बोलतो. त्यावर तुझ्याशी आमचा काहीही संबंध नाही, आमच्यावर तुझ्या अशा वागण्याचा काहीही परिणाम होणार नाही असे ऐकवतात. त्यावर तू शनयाकडे जा असे त्याचे वडील त्याला बोलतात. त्यावर ती पण मला सोडणार आहे असे गुरू सांगतो. गुरूचे हे बोलणे ऐकल्यावर तू तुझ्या कर्माची फळं भोग... असे त्याचे वडील त्याला बोलतात. त्यावर तुम्ही मला स्वतःच्या पावलावर उभे राहायला पैसे द्या... माझ्याकडे पैसे नाहीत, मला एक संधी द्या असे तो सांगतो. एवढेच नव्हे तर नागपूरची जमीन विकून पैसे देण्याबाबत सांगतो. 

आता पुढील भागात गुरूचे वडील नागपूरच्या जमिनीचे कागदपत्रं त्याला देणार आहेत. आता या जमिनीच्या कागदपत्रांचा गुरू खरंच स्वतःच्या कामासाठी वापर करतो की पुन्हा शनायाकडे जातो हे पाहाणे रंजक ठरणार आहे.  

Web Title: zee marathi's mazhya navryachi bayko episode update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.