Zafar becomes the new Aaka for Ginoo on Sony SAB’s Aladdin: Naam Toh Suna Hoga | 'अलादीनः नाम तो सुना होगा' मध्ये येणार ट्विस्ट
'अलादीनः नाम तो सुना होगा' मध्ये येणार ट्विस्ट

सोनी सबच्या 'अलादीन नाम तो सुना होगा'ने आपल्या कथेने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. या शोचे आगामी भाग पाहणे प्रेक्षकांसाठी अधिकच रोमांचकारी असणार आहे. जिनू (राशुल टंडन) अम्मीसोबत (स्मिता बन्सल) दिव्याचा जिनी असल्याचे रहस्य शोधत असताना त्याच्या मार्गात आणखी अडथळे येत आहेत.
 
अम्मीच्या समोर जिनूचे खरे रूप समोर आल्यापासून त्याची प्रचंड भावनिक घालमेल होत आहे. अम्मीने त्याला नाकारल्यामुळे दुखावलेला जिनू निघून जायचे ठरवतो. परंतु, अलादीन (सिद्धार्थ निगम) दिवा घासून जिनूला परत बोलवायचा प्रयत्न करतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अंगठीचा जिनी अलादीनवर ताबा मिळवून दिवा स्वतःकडे घेतो. जिनूच्या समस्यांमध्ये आणखी भर घालताना जफर (अमीर दळवी) अंगठीच्या जिनीद्वारे दिवा मिळवतो आणि आता जादुई दिवा रगडून जिनूला पकडण्यासाठी तो तयार आहे.

जिनूच्या भूमिकेतील राशुल टंडन म्हणाला की, ''अम्मीने त्याला निघून जायला सांगितल्यावर आणि ती त्याच्यावर रागावलेली आहे हे कळल्यावर जिनू उद्ध्वस्त झाला आहे. परंतु, जफरच्या हातात दिवा लागल्यामुळे आणि जिनू लवकरच त्याच्या ताब्यात येणार असल्यामुळे त्याला आणखी समस्या येतील. प्रेक्षकांना या सगळ्या मनोरंजक उलथापालथीचा आनंद घेता येईल. त्यात अनेक खाचखळगे आहेत आणि चढउतारही.''


Web Title: Zafar becomes the new Aaka for Ginoo on Sony SAB’s Aladdin: Naam Toh Suna Hoga
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.