You will be surprised to see the real life photos of Godavakaka, which is the color of life in you. | ​तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील गोदाक्कांचा म्हणजेच छाया सांगावकर यांचा खऱ्या आयुष्यातील फोटो पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का
​तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील गोदाक्कांचा म्हणजेच छाया सांगावकर यांचा खऱ्या आयुष्यातील फोटो पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का
तुझ्यात जीव रंगला ही मालिका सुरू होऊन अनेक महिने झाले आहे. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील राणा दा, अजंली बाई यांची जोडी तर प्रेक्षकांना खूपच आवडते. या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत. प्रेक्षकांना हे कलाकार आता त्यांच्याच घरातील सदस्य असल्यासारखे वाटू लागले आहेत.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील गोदाक्का तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ती घरातील सगळ्यांवर आईप्रमाणे माया करते. प्रत्येकाच्या समस्येत त्याच्या पाठिशी उभी राहाते. त्यामुळे गोदाक्का ही प्रेक्षकांना प्रचंड भावते. गोदाक्का ही व्यक्तिरेखा छाया सांगावकर ही अभिनेत्री साकारत आहे. छाया यांनी या मालिकेच्या आधी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण छाया यांनी खरी लोकप्रियता तुझ्यात जीव रंगला या मालिकेने मिळवून दिली. या मालिकेत गोदाक्का नेहमीच प्रेक्षकांना नऊवारी साडीत पाहायला मिळते. पण खऱ्या आयुष्यात गोदाक्का पंजाबी ड्रेस देखील घालते. तिला तुम्ही पंजाबी ड्रेसमध्ये पाहिले तर खरंच ही गोदाक्का आहे का हा तुम्हाला प्रश्न पडेल. गोदाक्का तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच वेगळी दिसते. 

dhanashri kadgaonkar


सध्या कोल्हापूरच्या रांगडी मातीतील प्रेमकथा प्रेक्षकांना 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाहायला मिळत आहे. दोन विभिन्न स्वभावाच्या दोघांची ही कथा आहे. राणा आणि अंजली यांची ही कथा असून राणा हा एक पहिलवान आहे. अतिशय श्रीमंत घराण्यातला असूनही त्याला आपल्या श्रीमंतीचा गर्व नाहीये. असा हा राणा दा सगळ्यांच्या पसंतीस पडत असला तरी पाठकबाई म्हणजचे अंजली देखील रसिकांच्या मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. 
तुझ्यात जीव रंगला या मालिकेत हार्दिक जोशी (राणा दा), अक्षया देवधर (अंजली बाई), धनश्री कडगावकर (नंदिता), राज हंचनाळे (सन्नी दा), मिलिंद दस्ताने (आबा) यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 

Also Read : ​अक्षया देवधर सांगतेय माझ्या यशात आहे या व्यक्तीचा वाटाWeb Title: You will be surprised to see the real life photos of Godavakaka, which is the color of life in you.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.