'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटू आणि नलूचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 03:52 PM2021-05-15T15:52:57+5:302021-05-15T16:08:55+5:30

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेने फार कमी वेगळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळ स्थान निर्माण केलंय.

Yeu kashi tashi mi nandayla fame anvita_phaltankar and dipti ketkar dance video viral | 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटू आणि नलूचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटू आणि नलूचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ

Next

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेने फार कमी वेगळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळ स्थान निर्माण केलंय.. या मालिकेतील प्रत्येक पात्राचं मोठं फॅन फॉलोविंग तयार झालंय.  येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील स्वीटू अर्थात अन्विता फलटणकर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते आणि त्यांना चाहत्यांची देखील पसंती मिळते.  अन्विताला अभिनयासोबतच डान्सची देखील आवड आहे.

यंदाच्या झी पुरस्कार सोहळ्यात ही स्वीटूनं आपल्या डान्सचा जलवा दाखवला होता. तिचे डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात ती आई नलूसोबत डान्स करताना दिसतेय. 

 माय-लेकी व्हायरल गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसातयेत. अभिनेत्री दिप्ती केतकर या मालिकेत नलिनी म्हणजेच नलूच्या भूमिकेत आहे.

स्मॉल स्क्रिनवरील टॉप मालिकांपैकी एक असणाऱ्या या मालिकेतील स्वीटूचा निरागस अंदाज सगळ्याचच लक्षवेधून घेणारा आहे.अन्विताने याआधीही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. रवी जाधव दिग्दर्शिक 'टाईमपास'मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Yeu kashi tashi mi nandayla fame anvita_phaltankar and dipti ketkar dance video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app