Yesubai from 'Swarajya Rakshak Sambhaji' will now appear in the series, in a new role | 'स्वराज्य रक्षक संभाजी'मधील येसूबाई आता दिसणार या मालिकेत, नव्या भूमिकेत

'स्वराज्य रक्षक संभाजी'मधील येसूबाई आता दिसणार या मालिकेत, नव्या भूमिकेत

स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील संभाजी महाराज आणि इतर महत्वाच्या पात्रांसोबतच येसूबाईंचे पात्रं देखील अतिशय प्रभावी आणि लोकप्रिय ठरले होते. या मालिकेत येसूबाईंचे पात्र हे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारले होते. आता प्राजक्ता लवकरच सोनी मराठी वाहिनीवरील 'आई माझी काळुबाई' या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत ती आर्या नामक मुलीची भूमिका साकारणार आहे. 

याआधी प्राजक्ता गायकवाड हिला ऐतिहासिक भूमिकेमधून प्रेक्षकांनी पाहिलं आहे पण एका कॉलेज मधल्या तरुणीची भूमिका पहिल्यांदाच ती करत आहे. या भूमिकेसाठी तिने थोडे वजन कमी केलं आहे इतकंच नाही तर स्वतःची स्टाईल आणि लूक सुद्धा प्राजक्ताने या भूमिकेसाठी बदलले आहे.

'आई माझी काळुबाई' या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. प्राजक्ताला एका नवीन भूमिकेत पाहण्यासाठी तिचा चाहतावर्ग देखील उत्सुक आहे. प्राजक्ता पहिल्यांदाच आपल्या वयाची भूमिका साकारत आहे.  आर्याचं एक पाऊल कशाप्रकारे तिचं आयुष्य बदलेल, तिच्या मदतीला काळुबाई कशी येईल हे सर्व पाहणं खूप मनोरंजक असणार आहे. 'आई माझी काळुबाई' ही मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Yesubai from 'Swarajya Rakshak Sambhaji' will now appear in the series, in a new role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.