'Yeh Rishta Kya Kahalata Hai' Fame Divya Bhatnagar's health is fragile, she has been on ventilator since she was infected | 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम दिव्या भटनागरची प्रकृती नाजूक, कोरोनाची लागण झाल्यापासून आहे व्हेंटिलेटरवर

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम दिव्या भटनागरची प्रकृती नाजूक, कोरोनाची लागण झाल्यापासून आहे व्हेंटिलेटरवर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये नोकराणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या भटनागर हिची प्रकृती गंभीर आहे. कोरोनाची लागण झाल्यापासून ती व्हेंटिलेटरवर आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. त्यात तिने लिहिले होते, हाय माझी इंस्टाग्राम फॅमिली..माझ्या तब्येतीसाठी प्रार्थना करा. तुम्हाला सर्वांना माझे प्रेम.

इंस्टा स्टोरीतील फोटोत दिव्या भटनागर हॉस्पिटलच्या बेडवर पहायला मिळतेय. तिच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क आहे. सध्या दिव्याची आई तिची काळजी घेण्यासाठी दिल्लीहून आली आहे. दिव्याच्या आईने ईटाइम्सशी बोलताना सांगितले की, दिव्याला मागील सहा दिवसांपासून खूप ताप होता. तिला अजिबात बरे वाटत नव्हते. मी दिल्लीहून इथे आली आहे. मी दिव्याची ऑक्सिजन पातळी चेक केली तेव्हा ती खालावली होती. आता ती व्हेंटिलेटरवर आहे आणि तिची प्रकृती नाजूक आहे. आता तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 


दिव्या भटनागरच्या आईनेहेदेखील म्हटले की, दिव्याचा नवरा फ्रॉड आहे. तो तिला सोडून गेला आहे आणि त्याने तिच्या तब्येतीबद्दल एकदाही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.


दिव्या तेरा यार हूँ में मालिकेत काम करत होती आणि मालिकेची टीम तिची मदत करणार आहे. दिव्याची आईने सांगितले की, त्यांच्या मुलांने शोच्या प्रोडक्शन हाउसला संपर्क केला होता. ते दिव्याच्या उपचारासाठी मदत करणार आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Yeh Rishta Kya Kahalata Hai' Fame Divya Bhatnagar's health is fragile, she has been on ventilator since she was infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.