ठळक मुद्देरुहानिकाला मोठी होऊन एक उत्कृष्ठ अभिनेत्री, सिंगर आणि फॅशन डिझायनर बनायचे आहे. 

काही लोक चांगले नशीब घेऊन जन्मतात, हेच खरे. असे नसते तर वयाच्या 12 व्या वर्षी कोट्यवधी रूपयांची संपत्ती, अलिशान गाडीत फिरण्याचे भाग्य वाट्याला आले असते? आम्ही बोलतोय ते चिमुकल्या रूहानिका धवनबद्दल. होय, ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतील मोस्ट फेमस चाइल्ड आर्टिस्ट रूहानिका आज कोट्यवधी रूपयांची मालकीण आहे.

 ‘ये है मोहब्बतें’  या लोकप्रिय मालिकेत रूहानिकाच्या अ‍ॅक्टिंगने सगळ्यांना वेड लावले.  दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेत रूहानिका क्युट मुलीची भूमिका साकारताना दिसली. या मालिकेने रूहानिकाला प्रचंड लोकप्रियता दिली. सोबत ऐश्वर्यही दिले.

आज कमाईच्या बाबतीत ती मोठ मोठ्या कलाकारांना मागे टाकते. आश्चर्य वाटेल पण 12 वर्षांची रुहानिका आज 6.5 करोड रुपयांची मालकीण आहे. ती प्रत्येक एपिसोडसाठी 25000 रुपये इतके मानधन मिळते.  आॅडी ए 4 मॉडेलच्या लक्झरी कारमधूनही ती शूटींगसाठी सेटवर यायची, त्यावेळी तिच्यावर सर्वांच्या नजरा खिळायच्या. तिच्या या कारची किंमत जवळ जवळ 50 लाख रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे, ही कार तिच्या आईवडिलांची नाही तर  रुहानिकाने स्वत: ही कार आपल्या कमाईमधून खरेदी केली आहे. इतकेच नाही तिने एक 3 बीएचके फ्लॅट देखील खरेदी केला आहे. 

2012 साली ‘मिसेज कौशिक की पांच बहुएं’ या मालिकेद्वारे रूहानिकाने तिच्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती ‘ये है मोहब्बतें’  या मालिकेत झळकली. यादरम्यान ‘घायल वन्स अगेन’ या चित्रपटात आणि काही जाहिरातींमध्येही तिची वर्णी लागली.
रुहानिकाला मोठी होऊन एक उत्कृष्ठ अभिनेत्री, सिंगर आणि फॅशन डिझायनर बनायचे आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: yeh hai mohabbatein fame ruhanika dhawan who gained fame and popularity in early age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.