टीवीवरील मोस्ट पॉप्युलर कपल करण पटेल आणि अंकिता भार्गवच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे.  आजतकच्या रिपोर्टनुसार करण आणि अंकिताच्या घरी डिसेंबरमध्ये पाळणा हलणार आहे. 2015 मध्ये करण आणि अंकिता लग्नाच्या बेडीत अडकले होते.    


रिपोर्टनुसार अंकिता आणि करण आपल्या होणाऱ्या बाळाला घेऊन खूप एक्सायडेट आहेत. येणाऱ्या बाळाच्या स्वागतासाठीच्या तयारीमध्ये ते दोघे सध्या बिझी आहेत. करण आणि अंकिताला सध्या ही गुडन्यूज सार्वजनिक होऊन द्यायची नाहीय. कारण गेल्या वर्षी जून महिन्यात करणची पत्नी अंकिताचा गर्भपात झाले होते. 


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर करण पटेलला ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतील रमन भल्ला या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. यावर्षी जुलैमध्ये करण पटेलने एकता कपूरची सुपरहिट मालिका सोडली आहे. खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होण्यासाठी करणने ही मालिका सोडली आहे.

करणच्या जागी मालिकेत चैतन्य चौधरीने एंट्री घेतली आहे. करण जवळपास सहा वर्षे या मालिकेचा भाग होता. त्यामुळे करणची जाग घेणे हे चैतन्यसमोरचे मोठं आव्हान होते. रिपोर्टनुसार करणची या शोमध्ये पुन्हा एकदा एंट्री होणार आहे.   


Web Title: Yeh hai mohabbatein fame karan patel ankita bhargava to become father busy in arrangements
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.