Wow ..!, Rasika Sunil did rifle shooting after flying the helicopter, you will be surprised to see the video | वाह..!, हेलिकॉप्टर चालवल्यानंतर रसिका सुनीलने केलं रायफल शूटिंग, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्

वाह..!, हेलिकॉप्टर चालवल्यानंतर रसिका सुनीलने केलं रायफल शूटिंग, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्

अभिनेत्री रसिका सुनील छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारते आहे. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. मालिकेने निरोप घेतला असला तरी रसिका सुनीलने प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. रसिका सोशल मीडियावर सक्रीय असून ती त्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिच्या खासगी आणि प्रोफेशनल लाइफबद्दल अपडेट देत असते. सध्या लॉस अँजेलिसमध्ये आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात ती हेलिकॉप्टर उडविताना दिसत होती. पुन्हा एकदा तिने एका व्हिडीओतून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी ती रायफल शूटिंग करताना दिसते आहे. 

रसिका सुनीलने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती रायफल शूटिंग करताना दिसते आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. इतकेच नाही तर तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागी यानेदेखील या व्हिडीओवर किती भारी अशी कमेंट केली आहे.


काही दिवसांपूर्वी रसिका सुनील हिने इंस्टाग्रामवर हेलिकॉप्टर उडवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. तिच्या या व्हिडीओत ती हेलिकॉप्टर चालवताना दिसते होती. तिने लॉस अँजेलिसमध्ये उडण्याचे प्रशिक्षण घेत असतानाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत रसिकाने आदित्य बिलागी याला डेट करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तिने आदित्यसोबतचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करून त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते. काही दिवसांपूर्वी रसिकाने आदित्यसोबतच्या नात्याबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले होते की, रसिका सुनीलने आदित्य बिलागी याला डेट करत असल्याचे कबूल केले आहे. तिने म्हटले की, हो आम्ही एकमेकांना डेट करतो आहे. मी आणि आदित्य सध्या लॉस अँजेलिसमध्ये नवीन वर्षात एकत्र आहोत. मी आनंदी ठिकाणी आहे.


रसिका सुनीलने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेव्यतिरिक्त गर्लफ्रेंड, बसस्टॉप आणि बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Wow ..!, Rasika Sunil did rifle shooting after flying the helicopter, you will be surprised to see the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.