Will Aladdin be able to stop Zafar from acquiring immense evil power | 'अलाद्दिन: नाम तो सुना होगा'मध्‍ये अलाद्दिन जफरला हे काम करण्यापासून थांबवू शकेल ?

'अलाद्दिन: नाम तो सुना होगा'मध्‍ये अलाद्दिन जफरला हे काम करण्यापासून थांबवू शकेल ?

ठळक मुद्दे. अलाद्दिन आता अत्‍यंत बिकट स्थितीमध्‍ये अडकला आहे. त्‍याला जफरच्‍या दुष्‍ट हेतूंचा संशय आला आहे.

सोनी सबवरील मालिका 'अलाद्दिन नाम तो सुना होगा' लक्षवेधक व अनोख्‍या कथेसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरली आहे. प्रेक्षकांना बगदादच्‍या जादुई विश्‍वामध्‍ये घेऊन जात मालिका आगामी एपिसोड्समध्‍ये काही चित्‍तथरारक ट्विस्‍ट्स आणि रोचक कथानक घेऊन येत आहे.

जफर (आमिर दळवी)  अलाद्दिनविरोधात (सिद्धार्थ निगम) दुष्‍ट योजना आखत आहे. जफर अम्‍मीच्‍या मनात संशय निर्माण करण्‍यासाठी गुलबदनला अलाद्दिनच्‍या घरामध्‍ये तलवार लपवण्‍याचा आदेश देतो. अलाद्दिनच्‍या कपाटामध्‍ये लपवलेली तलवार पाहून अम्‍मी अचंबित होते आणि अलाद्दिनला त्‍याबाबत विचारते. अलाद्दिनला गुलबदनचा संशय येतो, कारण त्‍याने गुलबदनला रात्रीच्‍या वेळी घरातून गुपचूप बाहेर पडताना पाहिलेले असते. अलाद्दिन व यास्मिन (अवनीत कौर) गुलबदनकडून सत्‍य उघडकीस आणून जफरच्‍या चंद्रग्रहणाच्‍या रात्रीदरम्‍यानच्‍या मोठ्या योजनेबाबत जाणून घेण्‍याची योजना आखतात. 

अलाद्दिनची भूमिका साकारणारा सिद्धार्थ निगम म्‍हणाला, ''आमचे चाहते व प्रेक्षक आमच्‍यावर करत असलेला प्रेमाचा वर्षाव पाहून मी अत्‍यंत भावूक झालो आहे. यामधून मला माझी भूमिका व मालिकेसाठी अधिकाधिक मेहनत घेण्‍याची प्रेरणा मिळते. अलाद्दिन आता अत्‍यंत बिकट स्थितीमध्‍ये अडकला आहे. त्‍याला जफरच्‍या दुष्‍ट हेतूंचा संशय आला आहे. तो यामागील सत्‍य जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. प्रेक्षक आगामी एपिसोड्स पाहण्‍यासाठी निश्चितच उत्‍सुक असतील, कारण लवकरच अनेक रहस्‍यांचा उलगडा होणार आहे.''

जफरची भूमिका साकारणारा आमिर दळवी म्‍हणाला, ''जफर प्रचंड दुष्‍ट शक्‍ती प्राप्‍त करण्‍यासाठी सर्वात मोठी दुष्‍ट योजना आखत आहे. जफरची यावेळी कोणती योजना आहे, हे पाहणे खूपच रोचक असणार आहे. एक कलाकार म्‍हणून माझ्यासाठी ही भूमिका साकारण्‍याचा अनुभव अत्‍यंत उत्‍साहवर्धक राहिला आहे. जफरच्‍या भूमिकेमध्‍ये अनेक पैलू आहेत, ज्‍याचा मी आनंद घेत आहे. या मालिकेचा संपूर्ण प्रवास अभूतपूर्व राहिला आहे. आम्‍ही आमच्‍या प्रेक्षकांना अधिक प्रभावित करण्‍यासाठी अधिकाधिक मेहनत घेण्‍याचा प्रयत्‍न करतो.''
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Will Aladdin be able to stop Zafar from acquiring immense evil power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.