Why is Pancham shocked by Elaichi's gift on Sony SAB's Jijaji Chhat Per Hain | 'जिजाजी छत पर हैं'मध्‍ये ईलायचीचे गिफ्ट पाहून पंचमला बसला धक्‍का?
'जिजाजी छत पर हैं'मध्‍ये ईलायचीचे गिफ्ट पाहून पंचमला बसला धक्‍का?

जेथे गुपित असते तेथे ते लपवण्‍याचा आटोकाट प्रयत्‍न असतो. 'जिजाजी छत पर हैं'मधील पंचम (निखिल खुराणा) आणि ईलायची (हिबा नवाब) यांचा त्‍यांच्‍या गुपचूप विवाहानंतर अशाच प्रकारचा प्रवास राहिला आहे. विवाहित जोडप्‍याच्‍या सुंदर प्रवासाला लवकरच एक महिना पूर्ण होत आहे आणि ते त्‍यांचा विवाह मुरारीपासून (अनुप उपाध्‍याय) लपवून ठेवण्‍याचा प्रयत्‍न करतच आहेत. जोडप्‍याची ही लपाछुपी या उत्‍साही जोडीला त्‍यांच्‍या प्रेममय क्षणांचा आनंद घेण्‍यापासून आणि एकमेकांना अचंबित करण्‍यापासून रोखू शकली नाही. मालिकेला पंचम व ईलायचीचा प्रवास पाहणा-या त्‍यांच्‍या प्रेक्षकांकडून भरघोस प्रेम व पाठिंबा मिळाला आहे आणि त्‍यांच्‍या गुपचूप विवाहानंतर देखील ते या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.  


ईलायची मुरारीने तिचा विवाह मान्‍य केल्‍याचे स्‍वप्‍न पाहत असते. पण वास्‍तविकत: या जोडीला त्‍यांच्‍या कुटुंबापासून त्‍यांचा विवाह लपवून ठेवण्‍यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या सर्व गोष्‍टींदरम्‍यान ईलायची त्‍यांच्‍या विवाहाला एक महिना पूर्ण झाल्‍याच्‍या आनंदामध्‍ये पंचमला गिफ्ट देऊन सरप्राईज करण्‍याचे ठरवते. दुसरीकडे मुरारी जीवनात करूणा व त्‍याच्‍यामध्‍ये गमावलेला प्रेमाचा उत्‍साह पुन्‍हा मिळवण्‍याची इच्‍छा धरून आहे आणि तो दुकानातून सर्वात ट्रेण्डिंग कपडे खरेदी करतो. काही विलक्षण घटनांमुळे गिफ्ट्सची अदलाबदल होते. ईलायची आपण दि‍लेले गिफ्ट पंचमने उघडताना पाहण्‍यासाठी उत्‍सुक आहे, तर मुरारी करूणाला दिलेले गिफ्ट परिधान करताना पाहण्‍यासाठी उत्‍सुक आहे. 


ईलायचीची भूमिका साकारणारी हिबा नवाब म्‍हणाली, ''मालिका 'जिजाजी छत पर हैं'मधील आगामी एपिसोड्स अत्‍यंत कॉमेडी असणार आहेत आणि ते आमच्‍या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतील. ईलायची व पंचम त्‍यांच्‍या विवाहाला एक महिना पूर्ण झाल्‍याने साजरीकरणासाठी उत्‍सुक आहेत. 
पंचमची भूमिका साकारणारा निखिल खुराणा म्‍हणाला, ''आगामी आठवड्यांमधील एपिसोड्ससाठी शूटिंग करण्‍याचा अनुभव वेगळा व मजेशीर होता. पंचम ईलायचीकडून गिफ्ट मिळणार असल्‍याने खूश आहे. पण त्‍याला धक्‍का मिळणार आहे. मी आमच्‍या प्रेक्षकांचे आभार मानतो. त्‍यांनी आमची मालिका व आम्‍हाला दिलेला पाठिंबा तसेच आमच्‍यावर वर्षाव केलेल्‍या प्रेमासाठी आम्‍ही त्‍यांचे शतश: आभारी आहोत.'' 

Web Title: Why is Pancham shocked by Elaichi's gift on Sony SAB's Jijaji Chhat Per Hain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.