स्टार प्लसवरील लोकप्रिय डान्स रिॲलिटी शो ‘नच बलिये ९’ प्रत्येक आठवड्‌याला टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील जोड्‌यांच्या ‘ब्लॉकबस्टर’ परफॉर्मन्सेससह प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करत आहे. आता ही स्पर्धा अधिकाधिक चुरस वाढत चालली आहे. या शोमधील स्पर्धक वेगळ्‌या प्रकारचे परफॉर्मन्सेस करून सर्वांना प्रभावित करत आहेत.

 या वीकेन्डला लोकप्रिय अभिनेता प्रभास व त्याची सहकलाकार श्रद्धा कपूरसोबत ‘नच बलिये ९’च्या मंचावर आपला आगामी चित्रपट साहोच्या प्रमोशनसाठी येणार आहे.


नच बलियेचा सूत्रसंचालक मनीष पॉल म्हणाला, “या सुपरस्टारचे व्यक्तिमत्त्व आणि स्टाईल याबद्दल अख्खा देश वेडा झालेला असताना खुद्द प्रभास मात्र बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या सौंदर्य आणि अदांवर भाळला आहे.” हे ऐकून या शोमधील परीक्षक आणि अव्वल कोरियोग्राफर अहमद खानने सुपरस्टार प्रभासला बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची नक्कल करण्याची विनंती केली. अर्थात त्याने ती मान्य केली आणि रवीना टंडनला आपल्यासोबत नाचण्याची
विनंती केली. सलमान खानच्या जुम्मे की रात है या गाण्यामधील सलमानच्या सिग्नेचर स्टेप्स अगदी सहजपणे केल्या.


त्याला अभिनेत्री रवीन टंडनसोबत नाचताना पाहण्याखेरीज प्रेक्षक या भागात पॉवर जोडी विशाल आणि मधुरिमा यांचा ‘टिप टिप बरसा पानी’ वर तर उर्वशी ढोलाकिया आणि अनुज सचदेव यांच्या ‘काटे नहीं कटते’वरील परफॉर्मन्सेस पाहून थक्क होतील.


ही सगळी मस्ती, अभूतपूर्व क्षण आणि असाधारण परफॉर्मन्सेस ‘नच बलिये ९’ वर शनिवार आणि रविवारी रात्री ८ वाजता फक्त स्टार प्लसवर पहा.

Web Title: When Prabhas imitated the Salman khan in Nach Baliye Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.