गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले त्यांच्या लग्नामुळे चर्चेत होते.  26 एप्रिलला सुगंधा आणि संकेत भोसले लग्नबंधनात अडकले. अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सुगंधा आणि संकेतचा विवाहसोहळा पार पडला.

 

या लग्नाच्या सोशल मीडियावर ब-याच चर्चा रंगल्या. लग्नापूर्वीच्या होणा-या कार्यक्रमांपासून ते लग्नापर्यंत सगळ्याच घडामोडी सोशल मीडियावर चागंल्याच रंगल्या. लग्नानंतर नवदाम्पत्याच्या मेहंदीपासून ते रिसेप्शनपर्यंत सगळेच फोटो समोर आले. लग्नातील धमाल मस्ती पाहायला मिळाली. आता सोशल मीडियावर संकेत भोसले आणि सुगंधा यांचा आणखीन मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. 


व्हिडीओमध्ये सुगंधा मिश्रा पती संकेतला चहासाठी विचारते. त्यानंतर तिचे मजेशीर उत्तर आणि चेह-यावरीह हावभाव पाहून चाहत्यांना हसू आवरणार नाही असा हा व्हिडीओ आहे. विशेष म्हणजे सुगंधाचे उत्तर ऐकून संकेतचा चेह-यावर उमटलेले हावभावही तितकेच मजेशीर आहे. दोघांचा हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. विशेष म्हणजे दोघांमध्ये खूप चांगले बॉन्डींग असल्याचे दिसते. मेड फॉर इच अदर कपल अशा कमेंट्स तिच्या या व्हिडीओत उमटत आहेत. दोघांचाही मजेशीर अंदाज पाहून चाहते हसून हसून लोटपोट होत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 


सुगंधा आणि संकेत यांचे हे लव्ह मॅरेज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. तसचं गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते. सुगंधा आणि संकेत दोघांनी अनेक कॉमेडी शोमधून रसिकांचे मनोरंजन केलं आहे. 'द कपील शर्मा' या शोमध्ये संकेत संजय दत्तची मिमिक्री करताना पाहायला मिळाला होता. कपिल शर्मा शोमध्ये सुगंधानेच संकेतला आणले होते. 

सुगंधा मिश्राने गेल्या काही वर्षांत एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून तिची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. गानसमाज्ञी लता मंगेशकर यांची मिमिक्री तर ती खूपच छान करते. या मिमिक्रीसाठी तिला लता मंगेशकर यांच्याकडून देखील दाद मिळाली आहे. ती द कपिल शर्मा शो मध्ये देखील झळकली आहे. डॉ. संकेत भोसले हा प्रसिद्ध कॉमेडियन असून संजय दत्तची मिमिक्री तो खूप चांगल्याप्रकारे करतो. तो व्यवसायाने डॉक्टर आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: What did Newly wed Sugandha Mishra do after her marriage, Sanket Bhosale turned shocking after her 2nd day of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.