Wedding Bells In Raja Rani Chi Ga Jodi Tv Serial | आणखीन एक कपल अडकणार लग्नबंधनात, सुरू झाली लगीनघाई !

आणखीन एक कपल अडकणार लग्नबंधनात, सुरू झाली लगीनघाई !

असे म्हणतात, लग्न म्हणजे सात पावलांनी जोडले जाणारे जन्मभराचे ऋणानुबंध. ज्या व्यक्तिच्या आपण शोधात असतो देव त्या व्यक्तिची भेट अजाणतेपणी घडवून आणतोच आणि मग सुरू होतो सहजीवनाचा साता जन्माचा प्रवास. जन्मभराच्या या गाठी बहुतांशी परस्परविरोधी स्वभावाच्या माणसांमध्ये जोडल्या जातात. असेच काहीसे संजीवनी आणि रणजीतच्या बाबतीत घडले आहे. लवकरचा यांचा विवाहसोहळा रसिकांना छोट्या पडद्यावर पाहाणे रंजक ठरणार आहे. हा विवाहसहोळा रिल असला तरी रिअल वाटावा अशारितीने पार पडणार आहे. 

संजीवनीला रणजीत बघता क्षणीच आवडला आणि दुसर्‍याच क्षणी कळलं रणजीत आपला होणारा दाजी आहे आणि हा संजीवनीसाठी खूप मोठा धक्का होता... पण, नियतीला कुठेतरी हे मान्य नव्हते, संजीवनीच्या बहिणीचे म्हणजेच स्वरांगीचे प्रेम कोणा दुसर्‍यावर असल्याकारणाने ती घर सोडून जाते.


यासगळ्या घटनेनंतर संजीवनीला रणजीत रीतसर लग्नाची मागणी घालतो. संजीवनी रणजीतशी लग्न करण्यास होकार देखील देते... पण कोणत्या कारणामुळे ती होकार देते ? संजीवनी खुश आहे का ? हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे. अनेक चढउतार, अडचणी आल्यानंतर संजीवनी – रणजीतचे ऋणानुबंध जोडले जाणार आहेत. ह्या राजा रानीचा लग्न सोहळा आनंदात, धुमधडाक्यात पार पडणार आहे. 

Web Title: Wedding Bells In Raja Rani Chi Ga Jodi Tv Serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.