फक्त जोरजोरात हसण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चना पूरन सिंहला मिळते इतके मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 06:14 PM2021-10-13T18:14:24+5:302021-10-13T18:20:19+5:30

कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पुरनसिंह तिच्या मानधनामुळेच चर्चेत आली आहे. फक्त जोरजोराने हसण्यासाठी अर्चनाला भली मोठी रक्कम मानधन म्हणून मिळते.

Wealthy laughing, check how much Archana singh earns for laughing in Kapil Sharma show | फक्त जोरजोरात हसण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चना पूरन सिंहला मिळते इतके मानधन

फक्त जोरजोरात हसण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चना पूरन सिंहला मिळते इतके मानधन

Next

रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्याचे काम कॉमेडियन कपिल शर्मा या शोच्या माध्यमातून करतो. छोट्या पडद्यावरचा हा प्रचंड लोकप्रिय शो आहे. शोमधले कलाकार कॉमेडी स्किट सादर करत रसिकांना हसून हसून लोटपोट करत असतात.शोमधला प्रत्येक कलाकार आज घराघरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांची प्रचंड लोकप्रियता असल्याचे पाहायला मिळते. जितके लोकप्रिय चेहरे तितकेच त्यांना भली मोठी रक्कमही मानधनाच्या रुपात मिळते. प्रत्येक कलाकाराला त्यांच्या क्षमतेनुसार मानधन मिळतं.

 

 सध्या अर्चना पुरनसिंह तिच्या मानधनामुळेच चर्चेत आली आहे. फक्त जोरजोराने हसण्यासाठी अर्चनाला भली मोठी रक्कम मानधन म्हणून मिळते. मानधनाच्या रुपात मिळालेली रक्कमही छोटी मोठी नाहीय. अर्चना पूरन सिंहला 10 लाख रुपए एपिसोड इतके मानधन दिले मिळते. तर शोचा कॅप्टन ऑफ द शिप समजला जाणारा कपिल शर्मा 50 लाख रुपए  एपिसोडनुसार चार्ज करतो. शोमध्ये अनेकदा कपिल अर्चनाची फिरकी घेत असल्याचे पाहायला मिळते. अर्चनाच्या आधी नवज्योत सिंग सिद्धू या शोचा भाग होते. मात्र त्यांनी शो सोडल्यानंतर त्यांच्या जागी अर्चनाची वर्णी लागली होती. हाच मुद्दा बनवत अनेकदा कपिल तिची टर खेचताना दिसतो. इतकेच काय तर सोशल मीडियावर अर्चना पूरन सिंह आणि नवज्योत सिंग सिद्धूवरुन मिम्सही व्हायरल होत असतात. 

यावर अर्चनानेही आपले मत मांडले होते.  'सिद्ध शोमध्ये परत येणार असतील, तर मी हा शो सोडायला तयार आहे. कारण माझ्याकडं करण्यासारखी अनेक कामं आहेत. असे उत्तर तिने नेटीझन्सना दिले होते. अनेकदा अर्चना शोमध्ये काय करते असा प्रश्नही उपस्थित केला जातो. यावर तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, ज्या लोकांना वाटतं की, मी काहीच करत नाही, त्यांनी एकदा शूटिंग कसे केले जाते हे येऊन पाहावं. सहा ते सात तास एकसारखं सोफ्यावर बसून राहणं, स्टेजवरच्या सादर होणारे स्किट्सवर लक्ष देणं. त्याहूनही कठीण ते  एकाचं दिशेनं पाहून हसणं, हे सर्व दिसतं तितकं  सोपं नाहीय. प्रत्येक विनोद, प्रत्येक वाक्य मला नीट ऐकावं लागतं. त्यावर प्रतिक्रियाही द्यायची असते'. त्यामुळे इतरांप्रमाणे माझंही काम तितकंच आव्हानात्मक असल्याचे अर्चनाने सांगितले होते. 

Web Title: Wealthy laughing, check how much Archana singh earns for laughing in Kapil Sharma show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app