Watch Prajakta Gaikwad working out in Saare in a Gym on our Insta Reel Video | अफलातून, प्राजक्ता गायकवाड साडी परिधान करत जिममध्ये करतेय वर्कआऊट, व्हिडीओ एकदा पाहाच

अफलातून, प्राजक्ता गायकवाड साडी परिधान करत जिममध्ये करतेय वर्कआऊट, व्हिडीओ एकदा पाहाच

'स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड काही दिवसांपूर्वी खूप चर्चेत आली होती. पुन्हा एकदा तिच्या एका व्हिडीओमुळे ती चर्चते आली आहे. तिचा हा व्हिडीओ जुना असला तरी तो पुन्हा एकदा प्रचंड व्हायरल होत आहे.तिच्या या व्हिडीओने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आजपर्यंत आपण अनेक अभिनेत्रींना योगा करताना किंवा जिममध्ये वर्कआऊट करताना पाहातो. वर्कआऊटसाठी त्यानुसार ड्रेस परिधान करत ते घाम गाळताना दिसतात. 

अशाच फिटनेस फ्रिक अभिनेत्रींप्रमाणे प्राजक्ता गायकवाडही फिटनेसफ्रिक अभिनेत्री बनली आहे. इतरांप्रमाणे जिममध्ये वर्कआऊट तर करतेय पण तिचा अंदाज मात्र पारंपरिक आहे, यावेळी प्राजक्ताने सुंदर साडी परिधान केली आहे. केसांचा आंबडा आणि त्याभोवती मोगऱ्याचा गजरा, तसेच कपाळावर उठवदार कुंकू असा श्रुंगार करत ती थेट जिममध्ये पोहचली आणि त्याच वेषात ती वर्कआऊट करताना दिसत आहे. याचदरम्यानचा तिचा हा व्हिडीओ समोर येताच तुफान व्हायरल झाला आहे. सध्या  या लूकची रसिकांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्चाही वर्षाव होत आहे.


प्राजक्ता गायकवाड 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतून घराघरात पोहचली. या मालिकेत तिने येसूबाईंचे पात्र साकारले होते. या मालिकेसाठी प्राजक्ताने घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले आहे.याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, संत तुकाराम मालिकेत काम केले आहे. 'आई माझी काळूबाई' या मालिकेला तिने अचानक निरोप घेतला. तिने अचानक मालिका का सोडली, याबाबत चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यानंतर ती आणि या मालिकेच्या निर्मात्या व अभिनेत्री अलका कुबल यांच्यात झालेल्या वादामुळे पुन्हा ती चर्चेत आली होती.

'स्वराज्य रक्षक संभाजी'मधील येसूबाई पोहोचल्या शेतावर आणि म्हणाल्या- हा गंध आपल्या मातीचा..

सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. प्राजक्ताने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेतातला फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्राजक्ता शेतात उभी आहे आणि तिच्या हातात फावडे आहे. या फोटोत सोबत प्राजक्ताने हा गंध आपल्या मातीचा ...हा गंध आपल्या अभिमानाचा असे कॅप्शन दिले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Watch Prajakta Gaikwad working out in Saare in a Gym on our Insta Reel Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.