करोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत.  करोनाचा फटका मनोरंजन क्षेत्रालाही बसला आहे. महाराष्ट्रात सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे अनेक मालिकांचं चित्रीकरण बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक  कलाकार बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. टीव्हीवरील लोकप्रिय मालिका वागळे की दुनिया मालिकेमधील  ‘श्रीनिवास वागळे’ अर्थात अभिनेते ​​अंजानन श्रीवास्तव देखील सध्या बेरोजगारीचे शिकार झाले आहेत.मालिकेचे निर्माते जेडी मजीठिया यांनी अंजान श्रीवास्तव आणि भारती आचरेकर यांना घरीच राहण्यास सांगितले आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक असल्याने, निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे.

 

दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना लॉकडाऊनमध्ये येणा-या अडचणींबद्दल खुलासा केला आहे. मागील एका महिन्यापासून ते घरीच आहेत.  पुन्हा शूटिंगसाठी बोलावलं जाईल  याकडेच त्यांचं लक्ष लागले आहे. सध्या करोनामुळे मालिकेचं शूटिंगही पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे काम नाही म्हणून हातात पैसे नाहीत. आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

असे कितीदिवस अजून घरात बसावे लागणार ? मी माझ्या कामाला खूप मिस करतोय, पुन्हा आधीसारखे काम करायचे आहे. रसिकांचे मनोरंजन करायचे आहे. अनेक चाहत्यांचेही मला मेसेज येतात की, मी पुन्हा कधी मालिकेत दिसणार याविषयी सतत विचारतात. त्यामुळे लवकरात लवकर सगळे सुरळित व्हावे. 

लॉकडाऊनमुळे मुंबई बाहेर जात  ‘वागले की दुनिया’ची टीम सिल्वासा येथे मालिकेच शूटिंग करत आहे. या मालिकेच्या सेटवही कोरोनाने शिरकाव केला होता. सेटवर ब-याच जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी  अंजान यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली. पण त्यांची सह-अभिनेत्री भारती आचरेकर यांना मात्र कोरोनाची लागण झाली होती. आता त्यांची तब्येत बरी असून अशक्तपणा मात्र जाणवतो. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Wagle ki Duniya Fame Senior actor Anjan Srivastava Is Jobless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.