Waghami shevde will come in chala hawa yeu dya | पाहा राणादाच्या मुलीची ही ऑनस्क्रिन धमाल, वाचा सविस्तर !
पाहा राणादाच्या मुलीची ही ऑनस्क्रिन धमाल, वाचा सविस्तर !

छोट्या पडद्यावर विशेष गाजलेली आणि अफाट लोकप्रियता मिळविलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. या मालिकेमध्ये उत्तम कलाकारांची निवड करण्यात आली असून प्रत्येक जण त्यांच्या भूमिकेला योग्य प्रकारे न्याय देत आहेत. नंदिता वहिनींची मालिकेतून एक्झिट झाल्यानंतर आता या साऱ्या कलाकारांच्या गर्दीमध्ये आणखी एका नव्या बालकलाकाराची एण्ट्री झाली आहे. मालिकेमध्ये रणा-अंजलीची मुलगी लक्ष्मीचं पदार्पण झालं असून ही चिमुकली अनेकांचं लक्षं वेधत आहे. मात्र ही लहान मुलगी नक्की आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नुकतंच या चिमुकलीने चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली.

निरागस चेहरा आणि राणादाप्रमाणेच बिनधास्त आणि बेधडकपणे बोलण्याची स्टाइल असलेली राजलक्ष्मी अर्थात लक्ष्मी अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे. या मालिकेमध्ये लक्ष्मीची भूमिका वाग्मी शेवडे या चिमुकलीने साकारली आहे. वाग्मी आठ वर्षांची असून ती मुंबईमधील आहे. वाग्मीला अभिनयाची आवड असून ती शाळेमध्ये कायम सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेते. आतापर्यंत तिने शाळेतील कार्यक्रमांमध्ये अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिका साकारल्या आहेत. वाग्मीच्या वडिलांचं नाव अमेय शेवडे असं असून ते मूळ साताऱ्याचे आहेत. मात्र कामानिमित्त सध्या मुंबईमध्ये स्थायिक आहेत.

Web Title: Waghami shevde will come in chala hawa yeu dya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.