video arshi khan was shocked to kissed by a fan this is how actress reacted | तो सेल्फी काढायला आला अन् अर्शी खानला किस करून गेला! व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

तो सेल्फी काढायला आला अन् अर्शी खानला किस करून गेला! व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

ठळक मुद्देअर्शी खान सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. अर्शीने इन्स्टाग्राम 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

‘बिग बॉस 14’च्या घरात ड्रामा क्वीन राखी सावंतला टक्कर देणारी अर्शी खान (Arshi Khan) सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. आता काय तर बयाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. सगळ्यांशी पंगा घेण्यासाठी तयार असलेल्या अर्शीसोबत एका चाहत्साने असे काही केले की, ज्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. होय, अर्शी खान एअरपोर्टवर मीडियाशी बोलत होती. तो आला आणि अचानक अर्शी खानला किस करून तिथून निघून गेला. तिचा हाच व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. (Arshi Khan was shocked to kissed by a fan)

तर काल रात्री अर्शी एअरपोर्टवर दिसली. काळ्या रंगाचा ड्रेस, डोळ्यांवर गॉगल अशा स्टायलिश अंदाजात एअरपोर्टवर दिसलेल्या अर्शी खानला पाहून सगळे फोटोग्राफर्स तिच्याभोवती जमा झालेत. अर्शी खान फोटोग्राफर्सशी बोलत असताना एक चाहता आला. त्याने अर्शीसोबत सेल्फी घेतली आणि सेल्फी घेतल्यानंतर अचानक अर्शीचा हात हातात घेऊन त्यावर किस करून निघून गेला. क्षणभर काय होतेय, हे अर्शीलाही कळले नाही. ती आश्चर्यचकित होऊन त्या चाहत्याकडे नुसती बघत राहिली आणि मग, चलो चलो... हो गया अभी म्हणून फोटोग्राफर्सला निघून गेली.

अर्शी खानचा हा व्हिडीओ काहीच क्षणात व्हायरल झाला. काही तासांत 3 लाखांवर लोकांनी हा व्हिडीओ बघितला. अनेकांना चाहत्याचे हे वागणे खटकले. त्याबद्दलचा संतापही त्यांनी बोलून दाखवला. काहींनी तर चक्क त्या चाहत्याविरोधात पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला अर्शीला दिला.
 अर्शी खान सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. अर्शीने इन्स्टाग्राम 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. अर्शी खान मात्र केवळ 90 लोकांना फॉलो करते़.अर्शी आपल्या चाहत्यांसाठी रोज नवे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: video arshi khan was shocked to kissed by a fan this is how actress reacted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.