वंदना पाठकचे खरे वडील बनले सुप्रिया पाठकचे पडद्यावरील वडील!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 12:07 PM2018-01-06T12:07:36+5:302018-01-06T17:37:36+5:30

‘खिचडी’ ही लोकप्रिय मालिका नव्या स्वरूपात प्रसारित होणार आहे. नव्या स्वरूपातील खिचडीत वंदना पाठक, राजीव मेहता, सुप्रिया पाठक, अनंग ...

Vandana became the true father of the reader, father of Supriya Pathak! | वंदना पाठकचे खरे वडील बनले सुप्रिया पाठकचे पडद्यावरील वडील!

वंदना पाठकचे खरे वडील बनले सुप्रिया पाठकचे पडद्यावरील वडील!

googlenewsNext
िचडी’ ही लोकप्रिय मालिका नव्या स्वरूपात प्रसारित होणार आहे. नव्या स्वरूपातील खिचडीत वंदना पाठक, राजीव मेहता, सुप्रिया पाठक, अनंग देसाई हे मूळ मालिकेतील कलाकार कायमच राहणार असल्याने पोट दुखेपर्यंत प्रेक्षकांची हसवणूक करण्यासाठी ही मालिका सिध्द झाली आहे.या मालिकेत काही बडे आणि नामवंत कलाकार भूमिका साकारणार असले, तरी त्यातील एक गमतीदार भाग आता उघड झाली आहे.या मालिकेचे निर्माते जे. डी. मजिथिया आणि आतिश कापडिया यांनी मालिकेतील कलाकारांच्या ख-या नातेवाईकांनाही या मालिकेत भूमिका दिल्या आहेत. उदाहरणार्थ, नामवंत अभिनेत्री रत्ना पाठक-शहा ही ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मालिकेत माया साराभाई ही भूमिका रंगवीत असून तिची बहीण सुप्रिया पाठक ही ‘खिचडी’त हंसा पारेखची भूमिका साकारीत आहे.वंदना पाठकचे वडील आणि अभिनेते अरविंद वैद्य हे ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’मध्ये मधुसूदन फुफाची भूमिका रंगवीत असून ते आता ‘खिचडी’च्या नव्या आवृत्तीत हंसा आणि हिमांशू पारेख यांचे पडद्यावरील वडील म्हणून भूमिका रंगविणार असल्याचे सांगितले जाते.या भूमिकांबद्दल जे. डी. मजिथिया म्हणाले, “माझ्या मालिकांतील काही कलाकारांच्या कुटुंबातच किती गुणी कलाकार भरलेले आहेत, ते पाहून मला आश्चर्य वाटतं. मग ती रत्नाजी असो, सुप्रियाजी असो की वंदनाजी असो. हे सर्व फारच थोर कलाकार असून ते माझ्या मालिकेत भूमिका रंगवीत आहेत, ही गोष्ट माझ्यासाठी फार मोलाची आहे. माझ्या मालिकांतील कलाकारांच्या नातेवाईकांची जी खिचडी

Also Read:​रत्ना पाठक शाह खिचडीमध्ये साकारणार ही भूमिका 

२००४ मध्ये प्रसारित झालेली ‘खिचडी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय बनली.नंतर त्या मालिकेवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता ही मालिका नव्या स्वरूपात प्रसारित होणार असून या मालिकेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. ‘खिचडी’ या मालिकेतील राजीव मेहता, अनंग देसाई, वंदना पाठक तसेच सुप्रिया पाठक हे कलाकार नव्या आवृत्तीतही कायम ठेवण्यात आले आहेत. जुन्या कलाकारांप्रमाणे काही नवे कलाकार देखील आता या मालिकेचा भाग असणार आहेत. हंसाचे व्हॉट इज प्रफुल्ल असे विचारणे, हंसा आणि प्रफुल्लची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. 

Web Title: Vandana became the true father of the reader, father of Supriya Pathak!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.