'माझ्या देशातील लोकं मरत असताना मी कसं लग्न करू' म्हणत अभिनेत्रीने रद्द केला तिचा विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 12:18 PM2021-05-12T12:18:43+5:302021-05-12T13:03:17+5:30

देशात सध्या सुरू असलेल्या कोरोनाचा हाहाकार पाहता तिने हा निर्णय घेतला आहे.

Vaishali takker postponed marriage said when people of my country are dying how can i celebrate | 'माझ्या देशातील लोकं मरत असताना मी कसं लग्न करू' म्हणत अभिनेत्रीने रद्द केला तिचा विवाहसोहळा

'माझ्या देशातील लोकं मरत असताना मी कसं लग्न करू' म्हणत अभिनेत्रीने रद्द केला तिचा विवाहसोहळा

googlenewsNext

'ससुराल सिमर' फेमची वैशाली टक्करचा गेल्या महिन्यात साखरपुडा झाला होता. या महिन्यात ती  डॉ. अभिनंदन सिंग हुंडलसोबत लग्न करणार अशी अपेक्षा होती. मात्र  अभिनेत्रीने आता हे लग्न पुढच्या वर्षी करण्याचा निर्णय घेतला आहे. वैशालीने आता कोरोना संकटात गरजूंना मदत करण्याचे ठरविले आहे. रस्त्यावर उतरुन ती लोकांना जेवण आणि वैद्यकीय मदत करते आहे.

वैशाली एका विद्यार्थ्यांच्या ग्रुपसोबत मिळून हे काम करत आहे. ईटाइम्सशी बोलताना अभिनेत्रीने सांगितले की, ती एका विद्यार्थ्यांच्या ग्रुपसोबत काम करते आहे जे या संकटकाळी गरजवंताना आवश्यक सुविधा पुरवत आहेत. ती पुढे म्हणते की, ज्या वेळी कोरोनामुळे लोक मरत आहेत आणि अस्वस्थ आहेत, त्यावेळी तिला कोणत्याही सेलिब्रेशन, लग्न आणि भारत सोडून जाण्याचा विचार करता येणार नाही.

अभिनेत्री पुढे म्हणाली, 'सध्याचे परिस्थिती पाहता मी माझे लग्न पुढे ढकलले आहे. मी अशा वातावरणात लग्न कसे करु शकते, जेव्हा लोक दररोज मरत आहेत, ते अस्वस्थ आहेत. यावर्षी मला नवं आयुष्य  सुरू करावंस वाटत  नाही आहे. यावर्षी माझे लग्न होणार नाही. सध्या भारत सर्वाधिक प्रभावित आहे आणि मी उत्सव, लग्न किंवा देशाबाहेर जाण्याच्या मूडमध्ये नाही. माझ्या देशात, जेव्हा आजूबाजूचे लोक पीडित आहेत आणि मरत आहेत, तेव्हा हे पाऊल उचलणे मला योग्य वाटत नाही.

कोरोनाने देशात थैमान घातले आहे. रोज लाखो नवे रूग्ण सापडत आहेत. आॅक्सिजन, आयसीयू बेड्सअभावी रूग्णांना जीव गमवावा लागतोय. या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी बॉलिवूड, टेलिव्हिजन आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी पुढे येत मदतीचा हात दिला आहे. 
 

Web Title: Vaishali takker postponed marriage said when people of my country are dying how can i celebrate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.