'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहेत. मालिकेचे कलाकार वेळ मिळताच मस्त एन्जॉय करताना दिसतात. रिअल लाइफमध्ये सगळेच  मनमौजी आणि धम्माल मस्ती करणारे आहेत. मालिकेतील कलाकरांच्या धम्माल मस्तीचे फोटो वेळोवेळी सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

 मालिकेमध्ये बरेच ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.मग ते कामिनीचे घरात येऊन लतिकाचा अपमान करण असो वा अभिमन्युचीला लतिकाची आणि लतिकाला अभिमन्युची साथ मिळणं असो अभिमन्यू आणि लतिकाचे मालिकेध्ये वेगळे नाते बघायला मिळत आहे. त्यांच्यात कितीही मतभेद असले तरीदेखील संकटामध्ये ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहतात.मग ते अभिचे स्वप्न पूर्ण करायचे असो वा दौलतच्या विरुध्द उभे राहायचे असो अभिमन्युचे अकॅडमीचे लतिकाच्या साथीने आणि पुढाकाराने पूर्ण होताना दिसते आहे तर अभिच्या साथीने लतिकाने आता जाहिरात करण्याचा मोठा निर्णिय घेतला आहे आणि त्याला अप्पांचीदेखील परवानगी मिळाली आहे.

 आता लवकरच अकॅडमी जिथे बनणार आहे त्या जागेचे भूमिपूजन देखील होणार आहे. हा दिवस अभिमन्युसाठी खूप मोठा आहे. घरातील सगळेच खूप खुश आहेत.दुसरीकडे कामिनी आणि दौलत बरेच नाराज आहे .आता भूमिपूजननंतर जहागीरदार कुटुंब एकत्र मिळून हुर्डा पार्टी करणार आहेत. थंडी अजूनही काही कमी होत नाही. त्यामुळे या थंडीत हुरडा पार्टी करण्याची संधी अभि आणि लतिच्या परिवाराने काही सोडली नाही. हिवाळा आला, की हुरडा पार्टीला जायचे बेत ठरू लागतात.आता या पार्टीमध्ये नक्की सगळ्यांनी मिळून काय काय मज्जा केली हे लवकरच मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. मस्त शेकोटी पेटवून सगळं कुटुंब या हुर्डा पार्टीची मज्जा घेणार आहेत.


प्रेक्षकांच्या मिळणार्‍या उदंड प्रतिसादामुळे या मालिकेने नुकतेच 100 भाग पूर्ण केले. मालिकेतील पात्र, अभिमन्यू आणि लतिका यांची जोडी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अभीची आई म्हणजेच अतिशा नाईक, अभिची वाहिनी तसेच कामिनी, सज्जनराव यांची भूमिका देखील प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: urda Party In Marathi Serial Sundara Manamadhe Bharali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.