ठळक मुद्देतुझ्यात जीव रंगला या मालिकेतील सनी दा हा प्रेक्षकांचा लाडका असून तो नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. या मालिकेत सनीची भूमिका राज हंचनाळे साकारत असून त्याने इन्स्टाग्रामवर त्याच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे.

झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. रांगडा 'राणादा' आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांचे प्रचंड आवडते असून त्यांच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायला त्यांच्या चाहत्यांना आवडते. आज आम्ही तुम्हाला याच मालिकेतील एका कलाकाराविषयी एक खास गोष्ट सांगणार आहोत. या कलाकाराचे नुकतेच लग्न झाले असून सोशल मीडियाद्वारे त्याने ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील सनी दा हा प्रेक्षकांचा लाडका असून तो नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. या मालिकेत सनीची भूमिका राज हंचनाळे साकारत असून त्याने इन्स्टाग्रामवर त्याच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाद्वारे भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. राजने सहा वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले असून त्याची पत्नी ही हरयाणाची आहे. या मुलीचे नाव मौली असून 2013 पासून राज आणि ती एकमेकांना ओळखतात. 

राज आणि मौली दोघेही या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत असून त्यांची जोडी खूपच छान दिसत असल्याचे चाहते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

Web Title: tuzyat jiv rangala sunny da aka Raj Hanchanale got married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.