अक्षया देवधरचा हा मॉडर्न लुक तुम्ही पाहिला का? गच्चीवरचा video Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 12:46 PM2021-04-27T12:46:37+5:302021-04-27T12:51:30+5:30

तुझ्यात जीव रंगला ही मालिका संपून अनेक महिने झाले असले तरी ही मालिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे.

Tuzyat Jiv Rangala' fame Akshya Deodhar Modern look,video viral | अक्षया देवधरचा हा मॉडर्न लुक तुम्ही पाहिला का? गच्चीवरचा video Viral

अक्षया देवधरचा हा मॉडर्न लुक तुम्ही पाहिला का? गच्चीवरचा video Viral

Next

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत रसिकांना पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर नेहमीच सोज्वळ रुपात दिसली. मालिकेत नेहमी साडी परिधान करत असल्यामुळे तिचा ग्लॅमरस अंदाज क्वचितच तिच्या चाहत्यांना बघायला मिळाला. पण रसिकांची लाडकी अक्षया ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ दिसते, तितकाच ऑफस्क्रीन तिचा ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो. 

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका संपून अनेक महिने झाले असले तरी ही मालिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. या मालिकेतील राणादा, अंजली ही पात्र प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. या मालिकेमुळे अक्षया देवधरला प्रेक्षक अंजली म्हणूनच ओळखतात.अक्षया देवधर हिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली. अक्षयाने 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. पाठक बाई म्हणून अक्षया घराघरात पोहोचली.


सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या या ग्लॅमरस लूकची झलक बघायला मिळते.अक्षयाने तिच्या विविध फोटोशूट्समधील काही फोटोज इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर  शेअर केले आहेत. आता व्हिडीओही तिने शेअर केले आहेत. नुकताच गच्चीवर निवांत वेळ घालवत असल्याचा तिच्या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. तिच्या या व्हिडीओला भरपूर लाइक्ससुद्धा मिळाले आहेत. त्यामुळे तिच्या चेह-यावरील निरागस भाव पाहायला मिळतायत. सध्या पाठकबाई अर्थात अक्षया देवधरचा मॉडर्न अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.


मालिका आता संपली आहे. त्यामुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग ती करत आहे. सध्या वर्कआऊट करत तिच्या फिटनेसकडे लक्ष देत आहे. एरव्ही सतत शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी फारसा वेळ मिळत नसायचा. त्यामुळे पुन्हा कामात बिझी होण्याआधी ज्या गोष्टी करायला मिळाल्या नाहीत. त्या सगळ्या गोष्टी अक्षया एन्जॉय करताना दिसत आहे.

तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधर या व्यक्तीला करतेय मिस... सोशल मीडियाद्वारे दिली कबुली

अक्षया एका व्यक्तीला प्रचंड मिस करत असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. ही व्यक्ती कोण आहे हे कळल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे.तिनेच एक व्हिडिओ शेअर करून याविषयी सांगितले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून पाच तासांत 10 हजाराहून अधिक लाईक्स या व्हिडिओला मिळाले आहेत. तसेच आम्ही देखील अंजलीला मिस करत आहोत असे तिचे चाहते तिला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tuzyat Jiv Rangala' fame Akshya Deodhar Modern look,video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app