झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'ने अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेतील राणादा म्हणजेच हार्दिक जोशी, पाठक बाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर आणि वहिनीसाहेब म्हणजे धनश्री काडगांवकर या सर्व कलाकारांनी आपल्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. हे सर्व कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असून ते चाहत्यांशी संवाद साधत असतात. तसेच फोटोदेखील शेअर करत असतात. नुकताच पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधरने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे.

अक्षया देवधर हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो गोव्यातील असून त्यात ती खूप ग्लॅमरस दिसते आहे. या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेबद्दल सांगायचं तर मालिका रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत सध्या पाठकबाई आणि निवडक लोकांना राजा राजगोंडा हाच राणादा असल्याचं समजलं आहे. मात्र वहिनीसाहेबांना धडा शिकवायचा असल्याच्या कारणाने अद्याप हे सगळ्यांना सांगण्यात आलेलं नाही. तर नुकताच प्रसारीत झालेल्या भागात अंजलीचे वडील तिचं दुसरं लग्न लावू पहात आहेत. तिला लहानपणीपासून ओळखणारा मित्र व त्याचे वडील अंजलीला पाहून लग्न ठरवण्यासाठी येतात.

तर राणादा लग्न होऊ नये म्हणून अंजलीला पाहायला येणाऱ्या मुलाच्या वडीलांना अंजली बाई खूप विचित्र आहेत आणि लाडू तिचाच मुलगा आहे. नवरा तिला वैतागून निघून गेला असं सांगतो. त्यामुळे ते अंजलीसोबत मुलाचे लग्न न करण्याचा निर्णय घेतात. अंजलीला जेव्हा आपल्याबद्दल राणा असं बोललाय हे समजल्यावर ती त्याच्याकडे येऊन भांडू लागते. ती म्हणते की कधी संपणार हे सगळं.

अंजलीसोबत लग्न करण्यासाठी आलेला तिचा मित्र तिला शोधत मागून येतो आणि त्यालाही राणादाचं खरं कळतं. मग तो लग्न न करण्याचा निर्णय घेतो आणि ते अंजलीच्या घरून निघून जातात असे दाखवण्यात आलं आहे.  

Web Title: Tuzyat Jeev Rangala Fame Pathakbai aka Akshaya Deodhar glamrous look on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.