झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाईंना धडा शिकवण्यासाठी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनी म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगावकरला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तिने या मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनंही रसिकांना भुरळ पाडली आहे. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेतच पण धनश्री म्हणजेच नंदिता वहिनीदेखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. 

धनश्री काडगावकर ही विवाहित असल्याचं फार कमी लोकांना माहित आहे. तिचा नवरा सिनेइंडस्ट्रीतील नसून तो व्यवसायाने इंजिनिअर आहे. तिच्या नवऱ्याचे नाव आहे ध्रुवेश देशमुख.

धनश्री मुळची पुण्याची असून तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर २०१३ साली ध्रुवेशसोबत धनश्री लग्नबेडीत अडकली.

ध्रुवेश धनश्रीपेक्षा वयाने चार वर्षांनी मोठा आहे.

धनश्री काडगावकर झी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या रिएलिटी शोमधून घराघरात पोहोचली. खरं तर या शोमध्ये सहभागी होण्याचा धनश्रीची विचार नव्हता. पण आईच्या आग्रहामुळे ती या शोमध्ये सहभागी झाली आणि २४ स्पर्धकांमध्ये तिची निवड झाली. आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर धनश्री या शोच्या टॉप १० स्पर्धकांमध्ये पोहोचली.

'महाराष्ट्राचा सुपरस्टार'मुळे धनश्रीला 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती 'गंध फुलांचा गेला सांगून', 'जन्मगाठ' या मालिकांमध्ये झळकली.

मालिकांशिवाय 'झोपी गेलेला जागा झाला' आणि 'आधी बसू मग बोलू' या नाटकांमध्येही तिने काम केलं आहे.

दासबाबू दिग्दर्शित 'ब्रेव्हहार्ट' या चित्रपटातून धनश्रीने रूपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे.

या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता संग्राम समेळ मुख्य भूमिकेत होता. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tuzyat Jeev Rangala Fame Nandita Vahini Aka Dhanashree Kadgaonkar is married in real life, see her photo with her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.