छोट्या पडद्यावरील नंदिता वहिनी ही व्यक्तीरेखा साकारत रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. धनश्रीने साकारलेल्या नंदिताच्या भूमिकेत अस्सल ग्रामीण ठसका बघायला मिळाला होता. तुझ्यात जीव रंगला मालिकेत राणा-अंजली भूमिकेप्रमाणे नंदिता वहिनीही भूमिकेलाही रसिकांनी भरघोस पसंती दिली होती.  'महाराष्ट्राचा सुपरस्टार'मुळे धनश्रीला 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती 'गंध फुलांचा गेला सांगून', 'जन्मगाठ' या मालिकांमध्ये झळकली.'झोपी गेलेला जागा झाला' आणि 'आधी बसू मग बोलू' या नाटकांमधून धनश्रीने काम केले आहे. 'ब्रेव्हहार्ट' आणि 'चिठ्ठी' चित्रपटातही धनश्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. 

धनश्री सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. नुकताच धनश्रीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत धनश्रीचा ग्लॅमरस आणि तितकाच मार्डन अंदाज पाहायला मिळत आहे. धनश्रीच्या या फोटोला तिच्या फॅन्सकडून बरेच लाइक्स मिळत आहे. तसंच या फोटोवर तिचे मित्र-मैत्रिणी आणि फॅन्सकडून कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ऑनस्क्रीन लूकप्रमाणे तिच्या ऑफस्क्रिन लूकलाही चाहत्यांची विशेष पसंती मिळत आहे.

धनश्रीने शेअर केलेल्या फोटोत तिचा मेकओव्हर आणि तिचे सोशल मीडियावरील स्टायलिश फोटो याचीच चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरही धनश्री बरीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती सुरुवातीपासून आपले फोटो शेअर करत आली आहे. सुरुवातीचे तिचे फोटो आणि आताचे फोटो पाहिले तर तिच्यामध्ये आलेला बदल तुम्हालाही सहज लक्षात येईल.सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  इतर अभिनेत्रींप्रमाणे फिटनेस हा धनश्रीचा आवडीचा विषय आहे. त्यामुळेच की काय फिटेनसकडेही ती कधीच दुर्लक्ष होऊ देत नाही.   

लॉकडाऊन काळात धनश्रीदेखील तिचा कुकिंगचा छंद जोपासताना दिसली. विविध प्रकारचे केक बनवत ती केकचे फोटो चाहत्यांसह शेअर करत तिचा आनंद व्यक्त करताना दिसली. लॉकडाउनचा कालावधी वाढत होता त्याच प्रमाणे धनश्रीदेखील कुकिंगची आवड जोपासताना दिसत होती.  व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले. त्यामुळे मिळालेला वेळ तिने मस्त तिच्या कुटुंबियासोबत एन्जॉय करताना केला होता. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tuzyat Jeev Rangala Fame Actress Dhanashri Kadgaonkar Stylish Photo Cathes Everyone Eyeball On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.