'तुझ्यात जीव रंगला'ला टिआरपी रेसमध्ये पहिल्या पाच मध्ये मिळवता आले नाही स्थान, ही मालिका ठरली सरस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 03:00 PM2020-01-12T15:00:00+5:302020-01-12T15:00:01+5:30

तुझ्यात जीव रंगला या मालिकेला पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवता आलेले नाहीये.

'Tum jivan rangla' could not be won in TRP race in first five places | 'तुझ्यात जीव रंगला'ला टिआरपी रेसमध्ये पहिल्या पाच मध्ये मिळवता आले नाही स्थान, ही मालिका ठरली सरस

'तुझ्यात जीव रंगला'ला टिआरपी रेसमध्ये पहिल्या पाच मध्ये मिळवता आले नाही स्थान, ही मालिका ठरली सरस

googlenewsNext
ठळक मुद्देब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेला नुकतीच तीन वर्षं पूर्ण झाली आहेत. ही मालिका ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार गेल्या आठवड्यात चौथ्या क्रमांकावर होती. पण या आठवड्यात या मालिकेला पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवता आलेले नाहीये.



ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. गेल्या आठवड्यात देखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती. राधिका आणि सौमित्रचा विवाह झाल्यापासून प्रेक्षक पुन्हा या मालिकेकडे वळले आहेत.



अग्गंबाई सासूबाई ही मालिका ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार गेल्या आठवड्यात दुसऱ्या स्थानावर होती. यंदाच्या आठवड्यात देखील ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना चांगलेच आवडत असल्याचे दिसून येत आहे.

झी मराठीवर या आठवड्यात प्रेक्षकांना धुरळा २०२० हा विशेष कार्यक्रम पाहायला मिळाला होता. हा कार्यक्रम येत्या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या कार्यक्रमात झी मराठीवरील विविध कलाकारांना प्रेक्षकांना एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळाले होते.



नुकतीच सुरू झालेली लग्नाची वाईफ वेडिंगची बायको ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे. ही मालिका गेल्या कित्येक आठवड्यांपासून पहिल्या पाचमध्ये आहे.



ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पाचव्या क्रमांकावर आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडते. पण त्याचसोबत डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी महाराज यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावते आणि त्याचमुळे या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.

Web Title: 'Tum jivan rangla' could not be won in TRP race in first five places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.