या मालिकेने पूर्ण केला 300 भागांचा टप्पा, सेटवर केक कापून केलं सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 01:13 PM2019-09-26T13:13:41+5:302019-09-26T13:16:58+5:30

एकमेकांच्या अगदी विरोधी व्यक्तिमत्व असणाऱ्या राजवीर व मनवा या मुख्य भूमिका सिद्धार्थ बोडके आणि तितिक्षा तावडे यांनी उत्कृष्टपणे साकारल्या आहेत.

Tu ashi jawali raha serial completed 300 episode | या मालिकेने पूर्ण केला 300 भागांचा टप्पा, सेटवर केक कापून केलं सेलिब्रेशन

या मालिकेने पूर्ण केला 300 भागांचा टप्पा, सेटवर केक कापून केलं सेलिब्रेशन

googlenewsNext

 

राजवीर आणि मनवाची एक निराळी प्रेमकहाणी असलेली, 'तू अशी जवळी रहा' ही मालिका, अत्यंत लोकप्रिय आहे. एकमेकांच्या अगदी विरोधी व्यक्तिमत्व असणाऱ्या राजवीर व मनवा या मुख्य भूमिका सिद्धार्थ बोडके आणि तितिक्षा तावडे यांनी उत्कृष्टपणे साकारल्या आहेत. या विलक्षण प्रेमकहाणीने तिच्या आगळेपणामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलेले आहे.


अशी ही सगळ्यांची आवडती मालिका, यशाच्या शिखरावर विराजमान झाली आहे. नुकतेच 'तू अशी जवळी रहा' या मालिकेचे ३०० भाग पूर्ण झाले आहेत. मालिकेच्या संपूर्ण टीमने हे यश सेटवर साजरे केले. या छोटेखानी समारंभात, केक कापून आनंद साजरा करण्यात आला. ही मालिका यशस्वी होण्याचे श्रेय केवळ पडद्यावरील कलाकारांचे नसून, संपूर्ण टीमच्या कष्टांचे हे चीज आहे, असे कलाकारांनी आवर्जून नमूद केले आहे. सुरुवातीपासूनच, रसिक चाहत्यांचे प्रेम या मालिकेला लाभले, हे सर्वांच्या मेहनतीचे फळ आहे. या सेटवरील सहकलाकारांसोबत काम करणे, खूप आनंदाचे असल्याचे सर्वच कलाकारांचे म्हणणे आहे.


या यशाबद्दल बोलत असताना, मुख्य अभिनेत्री तितिक्षा तावडे म्हणते; "मालिकेचे ३०० भाग पूर्ण झाल्याचा, आम्हाला मनापासून आनंद झाला आहे. आम्हाला हे यश मिळाले, त्यासाठी मी सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार मानते. त्यांचे प्रेम व जिव्हाळा, यांच्या जोरावर हे यश मिळवणे आम्हाला शक्य झाले आहे. केक कापून हा आनंद आम्ही साजरा करत आहोत. मुख्य म्हणजे पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या आमच्या टीमला या आनंदात सहभागी करून घेतल्याशिवाय, हे सेलिब्रेशन पूर्ण होऊ शकत नाही. आमच्याइतकेच त्यांच्या कष्टांचा सुद्धा या यशात मोलाचा वाटा आहे."

Web Title: Tu ashi jawali raha serial completed 300 episode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.