Trolle caused by Sarah Khan leap surgery, see her photo | सारा खान लीप सर्जरीमुळे झाली ट्रोल, पहा तिचा हा Photo

सारा खान लीप सर्जरीमुळे झाली ट्रोल, पहा तिचा हा Photo


छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सारा खान हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे तिला ट्रोल करण्यात आले. तिला “बिदाई… सपना बाबुल का’मधून लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळेच बिदाईबद्दल सांगण्यासाठी तिने हा फोटो शेअर केला होता. 
सारा खानने पोस्ट केलेल्या फोटोवर तिला नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. त्यावेळी साराने ओठांची सर्जरी केल्याचा खुलासा केला आहे. यामुळे साराला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यावर सारानेही प्रत्युत्तर दिले आहे. तिने असे म्हटले आहे की, मी या सर्व कमेंट्‌सचा आनंद घेत असून मला हसायला येत आहे. नापसंद करणारे लोक असा प्रकार करतात आणि मला ट्रोल होण्याची सवय लागली आहे. तसेच मी ओठांची सर्जरी करणे हे चुकीचे ठरले आहे.

दरम्यान साराने नेटकऱ्यांना असेही सांगितले की, मी ओठांची सर्जरी केल्याचे ज्या नेटकऱ्यांनी चुकीचे ठरविले त्यांना सत्य माहिती नाही. तसेच खरेतर हे एक लिप फिलर आहे. मात्र ओठांची सर्जरी केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

“एक थी रानी एक था रावण’मध्ये महक चहलच्या जागी आता सारा खान दिसून येणार आहे. ‘स्लमडॉग मिलेनियर’मधील रिंग रिंग रिंगावर डान्स करताना ती दिसून येईल. महक चहलच्या तारखा उपलब्ध नसल्यामुळे जागी सारा खान दिसून येईल. अभिनयाच्या पलीकडे सारा खान संधी शोधत असताना या संधीबद्दल ती अतिशय आनंदी आहे. तिने आपला सराव सुरू केला असून, ती लवकरच शोमधील या डान्स सीक्वेन्सच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Trolle caused by Sarah Khan leap surgery, see her photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.