Tia bajpai faces financial crisis says i had spent my all savings before lockdown | Lockdown मध्ये या अभिनेत्रीची झाली बिकट अवस्था, संपले सर्व पैसे...

Lockdown मध्ये या अभिनेत्रीची झाली बिकट अवस्था, संपले सर्व पैसे...

लॉकडाऊनमुळे सगळेच लोक आपल्या घरात आहेत. त्यामुळे दुसरीकडे, सर्व कामे ठप्प झाली आहेत. टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल बोलायाचे झाले तर सध्याच्या परिस्थितीमुळे या इंडस्ट्रीला बराच तोटा सहन करावा लागतो आहे. कुणाचे पैसे बुडाले तर अनेक महिन्यांपासून कोणाला पैसे मिळालेले नाहीत. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार लॉकडाऊनमुळे अभिनेत्री टिया बाजपेयीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. 

रिपोर्टनुसार लॉकडाऊन सुरु होण्याच्या आधी सगळे पैसे संपले होते त्यामुळे लॉकडाऊनमध्ये तिला आर्थिक संकटाचा सामना करताना ती डिप्रेशनमध्ये गेली आहे. टिया इंडस्ट्रीमधील तिच्या मित्रांबद्दल आणि आत्महत्या केलेल्या कलाकारांबद्दल मोकळेपणाने बोलली आहे. ते म्हणाली,  'जे लोक आर्थिक अडचणींमुळे असे पाऊल उचलत आहेत त्यांच्या वेदना मी समजू शकते.' आमच्या कलाकारांसाठी ही वेळ खूप वाईट आहे आणि मला आशा आहे की ही वाईट वेळ लवकरच निघून जाईल. '

टिया म्हणाली, माझ्याकडे जाम केलेले सगळे पैसे संपले होते मला कळत नव्हते मी काय करु. मी आईला फोन करुन खूप रडली सुद्धा. याच कारणामुळे मी डिप्रेशमनमध्ये गेले होते. जवळपास एक आठवडा मी रडत होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tia bajpai faces financial crisis says i had spent my all savings before lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.