ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून नवी जोडी भेटीला, प्रसिद्ध कलाकारांच्या आहेत भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 03:36 PM2021-09-24T15:36:54+5:302021-09-24T15:37:23+5:30

गिरीश वसईकर या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी कलाकारांची तगडी फौज मालिकेत आहे.

Thipkyachi Rangoli gonna soon feature this new couple, check who is it | ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून नवी जोडी भेटीला, प्रसिद्ध कलाकारांच्या आहेत भूमिका

ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून नवी जोडी भेटीला, प्रसिद्ध कलाकारांच्या आहेत भूमिका

Next

नवी मालिका ठिपक्यांची रांगोळी रसिकांच्या भेटीला येत आहे.  ही गोष्ट आहे कानिटकर कुटुंबाची. कानिटकर कुटुंबासाठी आयुष्य म्हणजे सोहळा आहे आणि घरात घडणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट म्हणजे एखादा सण समारंभ. या कानिटकर कुटुंबाला जोडून ठेवणारा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजेच विनायक कानिटकर.अभिनेते शरद पोंक्षे विनायक कानिटकर ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.

या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकर आणि चेतन वडनेरे ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अपूर्वा आणि शशांक असं दोघांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून या मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. ज्ञानदा आणि चेतन यांनी याआधी बऱ्याच मालिकांमधून लक्षवेधी भूमिका साकारली आहे. 

या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगतान ज्ञानदा म्हणाली, ‘मी पहिल्यांदाच अश्या पद्धतीची भूमिका साकारते आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची संपूर्ण टीम.अनेक दिग्गज कलाकार आणि आमचे दिग्दर्शक गिरीश वसईकर यांनी अतिशय छान पद्धतीने मला ही भूमिका पार पाडण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. सेटवरचं सकारात्मक वातावरण काम करण्यासाठी नवी ऊर्जा देतं. अपूर्वा साकारताना तिची एनर्जी कॅरी करणं सुरुवातीला थोडं कठीण गेलं मात्र आता हळूहळू मला सवय होतेय. अशी भावना ज्ञानदाने व्यक्त केली.

तर शशांक ही व्यक्तिरेखा साकारणारा चेतन म्हणाला, ‘शशांक हा अतिशय हुशार मुलगा आहे. तो वैज्ञानिक आहे. परदेशातून कामाची संधी मिळत असली तरी कुटुंबाला सोडून त्याला परदेशी जाण्याची इच्छा नाही. त्याचा त्याच्या कुटुंबावर खूप जीव आहे. संस्कार आणि मूल्य जपणाऱ्या शशांकच्या आयुष्यात जेव्हा त्याच्या विरोधी विचारांची मुलगी येते तेव्हा नेमकं काय होतं हे मालिकेत पाहायला मिळेल. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या नावाप्रमाणेच मालिकेचं कथानकही नाविन्यपूर्ण आणि एकत्र कुटुंबाचं महत्त्व पटवणारं आहे. गिरीश वसईकर या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी कलाकारांची तगडी फौज मालिकेत आहे.

Web Title: Thipkyachi Rangoli gonna soon feature this new couple, check who is it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app