लॉकडाउनमुळे घरात बसलेल्या लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी ‘शक्तिमान’ ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. शक्तिमानच्या निमित्ताने, शक्तिमानची गर्लफ्रेंड असलेली म्हणजेच अभिनेत्री वैष्णवी महन्त पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वैष्णवीने शक्तिमानमध्ये गीता विश्वास ही व्यक्तिरेखा साकारली होती. शक्तिमानची प्रेयसी म्हणून प्रसिद्ध झालेल्या वैष्णवीला आजही गीता विश्वास या भूमिकेसाठी ओळखले जाते. नव्वदच्या दशकात छोट्या पडद्यावर विविध मालिकांनी रसिकांची मनं जिंकली. आजही या मालिका रसिकांच्या मनात घर करुन आहेत. 

शक्तीमान ज्या तरुणीवर प्रेम करायचा ती एक रिपोर्टर होती आणि तिचं नाव गीता विश्वास असं होतं. शक्तीमान मालिकेतील भूमिकेमुळे अभिनेता मुकेश खन्ना यांना जितकी लोकप्रियता आणि प्रेम मिळालं तितकंच रसिकांचं प्रेम गीता विश्वास ही भूमिका साकारणारी अभिनेत्री वैष्णवी महंत हिलाही मिळालं. शक्तीमान, गंगाधार आणि गीता विश्वास या व्यक्तीरेखांनी रसिकांवर जादू केली. त्यामुळे नव्वदच्या दशकात या मालिकेने  लोकप्रियतेचे सर्वोच्च शिखर गाठलं होतं.

 

कधी कुणी शक्तीमानच्या रुपात दिसायचं तर कुणी गंगाधर तर कुणी गीता विश्वासच्या रुपात दिसायचं अशी क्रेझ या मालिकेची सर्वसामान्यांवर पाहायला मिळत होती. शक्तीमान मालिकेला आता बरीच वर्षे लोटली आहेत. शक्तीमान साकारणा-या मुकेश खन्ना यांचंही वाढलेलं वय त्यांच्या केस आणि चेह-यावरुन सहज लक्षात येते. 

मात्र गीता विश्वास साकारणा-या वैष्णवी महंतबाबत वयाचा काटा बहुदा उलट्या दिशेने फिरतो आहे. कारण तिचं सध्याचं सौंदर्यं पहिल्यापेक्षा अधिक घायाळ करणार असल्याचे पाहायला मिळत आहे. वैष्णवी महंत सुंदर तर दिसतेच आहे शिवाय तिच्या अदा तितक्याच बोल्ड आणि अंदाजही हॉट असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी वैष्णवी महंतचे एक फोटोशूट समोर आले होते. या फोटोशूटमध्ये तिचा बोल्ड, हॉट आणि सेक्सी अंदाज पाहायला मिळाला.

गीताचे (वैष्णवी)चे हे फोटो पाहून छोट्या पडद्यावरील गंगाधरसुद्धा चक्रावून गेला नसता तरच नवल. शक्तीमान या मालिकेनंतर वैष्णवीने विविध मालिकांमध्ये काम केलंय. मिले जब हम तुम, सपने सुहाने लडकपन के, टशन-ए-इश्क या मालिकांमधील वैष्णवीच्या भूमिकांची चर्चा झाली.

1988 पासून विविध मालिका आणि सिनेमात तिने काम केले आहे. बंबई के बाबू या सिनेमातही तिने आपल्या अभिनयासह सौंदर्याची जादू दाखवली होती. याशिवाय लाडला सिनेमातही तिने भूमिका साकारली होती. 

Web Title: Then vs Now: Shaktimaan'S GirlFriend Geeta Vishwas Hot Look Would Have Clean Bold Gangadhar-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.