ठळक मुद्दे‘महाभारत’ मालिकेतील त्याने साकारलेली अर्जुनाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरली होती. 

एखाद्या रोलसाठी वजन वाढवणे किंवा घटवणे आजचा ट्रेंड आहे. पण मनोरंजन विश्वातील काहींनी प्रयत्नपूर्वक शरीरावर मेहनत घेत, वजन घटवत स्वत:ला फिट केले. हिंदी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय अभिनेता शाहीर शेख (Shaheer Shaikh) यापैकीच एक.  एकेकाळी शाहीर हा 95 किलो वजनाचा होता. पण आता मात्र तो अतिशय फिट आहे. शाहीरने त्याचा जुना फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचा हा फोटो पाहून हाच शाहीर यावर क्षणभर विश्वास बसत नाही.

शाहीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर  त्याचा अनेक वषार्पूर्वीचा फोटो पोस्ट केला आहे. त्यात तो चक्क 95 वजनाचा असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याच्या या फोटोवर  चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी तर विश्वास बसत नसल्याचे म्हटले आहे.

शाहीर हिंदी टेलिव्हीजनचा प्रसिद्ध चेहरा असून अनेक मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. त्याच्या मालिका या प्रचंड लोकप्रिय देखील झाल्या होत्या. 2009 साली ‘क्या मस्त लाइफ है’ या मालिकेतील लहानशा पात्रापसून त्याने करिअरला सुरुवात केली होती.

‘महाभारत’ मालिकेतील त्याने साकारलेली अर्जुनाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरली होती. यानंतर शाहीरने कधीच मागे वळून पाहिले नाही. अनारकली, कूछ रंग प्यार के ऐसे भी, झांसी की रानी, ये रिश्ते है प्यार के  अशा लोकप्रिय मालिकांमध्ये त्याने काम केल आहे. शाहीर हा भारताप्रमाणेच अनेक इंडोनियामधील मालिकेत देखील काम करतो. इंडोनेशिया मध्ये देखील त्याला चांगलीच लोकप्रियता आहे.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: television actor shaheer shaikh shares old pic of him with 95kg weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.