ठळक मुद्देतेजश्री प्रधानने आशुतोषसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, आपण दोघे भांडतो आणि थोड्याच वेळात भांडण विसरून देखील जातो. आपण अनेक सिक्रेट्स एकमेकांसोबत शेअर करतो.

अग्गंबाई सासूबाई या झी मराठीवरील वाहिनीला खूपच कमी वेळाच प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील बबड्या आणि शुभ्रा यांची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आावडते. या मालिकेत बबड्याची भूमिका आशुतोष पत्की साकारत असून शुभ्राच्या भूमिकेत आपल्याला तेजश्री प्रधानला पाहायला मिळत आहे. त्या दोघांची या मालिकेतील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. ते दोघे खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स असून आशुतोषच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तेजश्रीने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

तेजश्री प्रधानने आशुतोषसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, आपण दोघे भांडतो आणि थोड्याच वेळात भांडण विसरून देखील जातो. आपण अनेक सिक्रेट्स एकमेकांसोबत शेअर करतो. कधी तू माझा मित्र असतोस तर कधी माझा मार्गदर्शक. तुझ्याबद्दल मला प्रचंड अभिमान वाटतो. अतिशय स्मार्ट, मजेशीर व्यक्तिमत्त्व असलेल्या आणि अतिशय सुंदर व्यक्तीला माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

तेजश्रीची ही पोस्ट तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडली असून केवळ काहीच तासांत ८० हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. अग्गंबाई सासूबाई या मालिकेत बबड्याचे पात्र निगेटिव्ह दाखवण्यात आले आहे. यामुळे लोकांना त्याची चीड येत असून यावरून अनेक मीम्सही व्हायरल होत असतात. आशुतोष ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा असून अग्गंबाई सासूबाईच्या आधी त्याने दुर्वा, मेंदीच्या पानावर यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता अग्गंबाई सासूबाई या मालिकेमुळे मिळाली. 

अग्गंबाई सासूबाई या मालिकेत तेजश्री आणि आशुतोषसोबतच निवेदिता जोशी सराफ, गिरिश ओक यांच्या मुख्य भूमिका आहेत.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: tejashree pradhan give birthday wishes to her costar ashutosh patki from agga bai sasubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.