झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री मालिका जूनच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनी खूप चांगली दाद मिळाली. या मालिकेतील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत असलेला चेहरा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. त्याच्या भूमिकेचं नाव आहे समर पाटील आणि ही भूमिका 
अभिनेता तेजस बर्वे साकारताना दिसतो आहे. 

तेजस बर्वे मुळचा पुण्याचा असून एमएसजी विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण झाले आहेत. तसंच पुण्याच्या एस.पी. कालेजमधून त्याने काॅमर्समध्ये पदवी संपादन केली. अभिनयासोबतच तेजसला संगीत आणि क्रिकेटची सुद्धा आवड आहे.


 तेजसने विविध खेळांमध्ये राज्यस्तरीय पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे. महाविद्यालयात असल्यापासुनच पुण्यामधील अनेक नाट्यशिबिरांमध्ये आणि रंगभुमीवर तेजसने अभिनयाची आवड जोपासली.  

 २०१७ साली झी युवावर आलेल्या 'जिंदगी नाॅट आऊट' या मालिकेतून तेजसला ब्रेक मिळाला. या मालिकेत त्याने सचिनची भूमिका साकारली होती. त्याच्या या पहिल्याच भुमिकेचं सगळीकडून कौतुक झालं होतं.

 ही मालिका संपल्यानंतर तेजसला सध्या सुरु असलेल्या 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतून प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. या मालिकेतील त्याचा अभिनय प्रेक्षकांना भावतो आहे. मिसेस मुख्यमंत्री मालिकेत सध्या समर व सुमीच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होत असून समर सुमीकडे ती त्याला आवडत असल्याचं सांगताना दिसणार आहे. 

तेजस नुकताच प्रदर्शित झालेल्या गर्लफ्रेंड चित्रपटात झळकला होता.


Web Title: Tejas Barve is a great cricketer and singer, he is currently working in the series
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.