तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठा, दया, तारक, अंजली भाभी, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. नेहा मेहताने काही महिन्यांपूर्वी ही मालिका सोडल्यानंतर यात सुनैना फौजदारने अंजली भाभी म्हणून एंट्री घेतली. तिची ही भूमिका प्रेक्षकांना आवडली देखील.  रिपोर्टनुसार सुनैनाला अंजली भाभीच्या भूमिकेसाठी ऑडिशनल दिलं होतं. 

कोईमोईशी बोलताना सुनैना म्हणाली, “आम्ही सर्व कलाकारांचे ऑडिशनमधून जावचं लागतं. मी शोसाठी ऑडिशन  दिले आणि माझी निर्मात्यांसोबतत मीटिंग झाली. ही भूमिका रिप्लेस करणं त्यांच्यासाठी सोप्प नव्हतं. ” ते म्हणाले, "ही एक मोठी जबाबदारी आहे, कारण हा एक प्रसिद्ध शो आहे. प्रत्येक भूमिकेला भरभरुन दिलं जातं. 

अभिनेत्री म्हणाली, 'म्हणून निर्मात्यांनासुद्धा ते काय करीत आहेत याची खात्री करुन घ्यायची होती. त्यांच्यावरही तितकाच दबाव होता. मी असित सरांना (असित मोदी) भेटलो आणि ऑडिशन दिली. मी खूप खुश होते कारण मला कॉमेडी शोमध्ये काम करायचे होते.''

सुनैना फौजदारने संतान मालिकेतून छोट्या पडद्यावरील कारकीर्दीला सुरूवात केली होती. याशिवाय सुनैनाने बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. जसे की राजा की आयेगी बारात, कुबूल है आणि रहना है तेरी पलकों के छांव में या मालिकेत ती दिसली आहे. सुनैना सोशल मीडियावरील तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tarak mehta ka ooltah chashmah sunayana fozdar reveals she auditioned for anjali bhabhi role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.