'तारक मेहता...'मधील ‘रिटा रिपोर्टर’ ब्राची पट्टी दिसली म्हणून झाली ट्रोल, भडकलेल्या नवरोबानं असं दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 12:44 PM2021-07-22T12:44:01+5:302021-07-22T12:46:31+5:30

रिटा रिपोर्टर अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजा सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतेय. कारण काय तर तिचे ताजे फोटो.

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah fame priya ahuja aka rita reporter gets trolled for exposed her bra strap | 'तारक मेहता...'मधील ‘रिटा रिपोर्टर’ ब्राची पट्टी दिसली म्हणून झाली ट्रोल, भडकलेल्या नवरोबानं असं दिलं उत्तर

'तारक मेहता...'मधील ‘रिटा रिपोर्टर’ ब्राची पट्टी दिसली म्हणून झाली ट्रोल, भडकलेल्या नवरोबानं असं दिलं उत्तर

Next
ठळक मुद्देप्रियाने  2018 मध्ये दिग्दर्शक मालव राजदासह लग्न केले. त्या दोघांची ओळख ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ याच मालिकेच्या सेटवर झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah ) या प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिकेतील  रिटा रिपोर्टर  आताश: सगळ्यांच्याच ओळखीची झाली आहे. या मालिकेमुळे रिटा रिपोर्ट (Rita Reporter) घराघरात लोकप्रिय झाली. पण सध्या काय तर ही रिटा रिपोर्टर अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजा (Priya Ahuja) सोशल मीडियावर ट्रोल होतेय. कारण काय तर तिचे ताजे फोटो. होय, प्रियाने अलीकडे तिचे काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत आणि हे फोटो पाहून ट्रोलर्सने तिला ट्रोल करणे सुरू केले. या फोटोत प्रियाच्या ब्राची पट्टी दिसली आणि अनेकांनी यावरून प्रियाला नको ते ऐकवायला सुरूवात केली.

या फोटोत प्रियाने ब्ल्यू डेनिम शर्ट व ब्लॅक कलरची पँट परिधान केलेली दिसतेय. ‘जे तुमच्या आत्म्याला समाधान देतं, ते करा,’ असं कॅप्शन हे फोटो शेअर करताना तिने दिले. प्रियाचे हे फोटो तिचा नवरा मालव राजदा यांनी क्लिक केले होते. मात्र हे फोटो शेअर करताना अनेकांनी प्रियाला सभ्यता आणि संस्कृतीवर लेक्चर देणे सुरू केले. काहींनी तर अगदी खालच्या भाषेत प्रियाला ट्रोल केले.

पती संतापला...
प्रियाच्या फोटोवरच्या काही अतिशय खालच्या भाषेतील कमेंट्स पाहून तिचा पती मालव चांगलाच भडकला. त्याने ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिले. ‘हेच तुमच्या आई-बहिणींना बोलून बघ आणि पाहा त्यांची प्रतिक्रिया कशी येते ते,’अशा शब्दांत त्याने ट्रोलर्सनी बोलती बंद केली.
प्रियाने  2018 मध्ये दिग्दर्शक मालव राजदासह लग्न केले. त्या दोघांची ओळख ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ याच मालिकेच्या सेटवर झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. प्रिया व मालव यांना एक मुलगा आहे.  
 

Web Title: Tarak Mehta Ka Ooltah Chashmah fame priya ahuja aka rita reporter gets trolled for exposed her bra strap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app