ठळक मुद्देनिधी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. इन्स्टावर तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील जुनी सोनू अर्थात निधी भानुशाली सध्या जाम चर्चेत आहे. कारण काय तर तिचे बोल्ड फोटो. होय, निधीने असे काही बोल्ड फोटो शेअर केलेत की, सगळेच अवाक् झालेत. गोव्यात सुट्टीचा आनंद घेत असलेल्या निधीने स्विमसूटमधील हे फोटो शेअर केलेत आणि ते लगेच व्हायरल झालेत. इतकेच नाही तर या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडला. भिडे सर, आपकी बेटी तो हाथ से निकल गई... अशा मजेदार कमेंट्स युजर्सनी केल्यात.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये आत्माराम तुकाराम भिडे यांच्या मुलीची भूमिका निधीने साकारली होती. अनेक वर्षे ही भूमिका साकारल्यानंतर गेल्यावर्षी तिने ही भूमिका सोडली होती.

अभ्यासाला वेळ देता यावा म्हणून तिने ही मालिका सोडली होती. आता तिच्याजागी पलक सिंधवानी सोनूची भूमिका साकारते आहे. निधी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधून बाद झाली पण सोशल मीडियावर मात्र ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. याच निधीने असे काही फोटो शेअर केलेत की, क्षणभर हीच भिडेची सोनू यावर लोकांचा विश्वास बसेना.

 या फोटोत निधी निळ्या आणि काळ्या रंगाच्या स्विमवेअरमध्ये  दिसतेय. गोव्याच्या समुद्रकिना-यावर धम्माल मस्ती करताना ती दिसतेय.  
सर्वप्रथम सोनूची भूमिका झील मेहताने साकारली होती. 9 वर्षांच्या वयापासूनच झीलने या मालिकेत काम करणे सुरु केले होते. पण तिनेही अभ्यासासाठी ही मालिका सोडली होती.

तिच्या नंतर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये निधी भानूशालीची एन्ट्री झाली होती. निधी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. इन्स्टावर तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: tarak mehta ka ooltah chashmah actor nidhi bhanushali aka sonu bhide shared swimsuit pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.