स्टार प्लस वाहिनीवरील ‘कसौटी जिंदगी के’ मालिकेत लवकरच बंगाली पद्धतीचा विवाह पार पडणार असून त्यातील विधी आणि परंपरांच्या माहितीसाठी बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूकडे विचारणा करण्यात आली आहे.

बिपाशाचा पती करण सिंग ग्रोव्हर हा या मालिकेत मिस्टर बजाज ही खलनायकाची भूमिका साकारीत आहे. या दोघांचा विवाहसुद्धा बंगाली पद्धतीने पार पडला होता. बिपाशा स्वत: बंगाली भाषिक असल्याने बंगाली पद्धतीच्या विवाहातील विधी, परंपरा यांची माहिती घेण्यासाठी तिच्यासारखी दुसरी कोण असणार.


मालिकेची नायिका प्रेरणाचा विवाह होणार असल्याची कल्पना प्रेक्षकांना आहे. या मालिकेच्या प्रसारणास प्रारंभ झाल्यापासून प्रेरणाचा विवाह कधी होतो, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते.

त्यामुळे आता या विवाहाचे चित्रीकरण करताना निर्मात्यांनी बिपाशाला आपल्या लग्नाच्या अल्बमचा आधार घेऊन त्यातील प्रत्येक विधी आणि रूढी यांची माहिती देण्याची विनंती केली आहे. लग्नासारखे प्रसंग हे वास्तवातील विवाहांप्रमाणेच आणि मूळ रीतिरिवाजांनुसारच होत आहेत की नाहीत, याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.


सध्या सुरू असलेली ‘कसौटी झिंदगी के’ ही मालिका मूळ मालिकेचाच पुढील भाग आहे. मूळ मालिकेला देशभरातील प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम लाभले होते.

आता तब्बल १८ वर्षांनी ‘कसौटी झिंदगी के’चा हा पुढील भाग प्रसारित होत असून ‘स्टार प्लस’वरून सोमवार ते शुक्रवार रात्री 8.00 वाजता या मालिकेचे प्रसारण केले जाते.

Web Title: Take help of bollywood actress for Kasauti Jindagi ke Serial wedding scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.